NCP Dhanajay Munde on State budget | Sarkarnama

अर्थसंकल्पातून जनतेच्या पदरी पुन्हा गाजर  - धनंजय मुंडे

गोविंद तुपे:   सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 मार्च 2018

राज्य सरकारने सादर  केलेल्या अर्थसंकल्पातून गाजराच्या पलीकडे जनतेच्या हातात काहीही पडले नाही.

मुंबई : "  राज्य सरकारनेसादर  केलेल्या अर्थसंकल्पातून गाजराच्या पलीकडे जनतेच्या हातात काहीही पडले नाही. 15 हजार कोटीच्या तुटीचा अर्थसंकल्प मांडण्यात आल्याने सरकारच्या आर्थिक बेशिस्तीचा कारभार उघडा पडला आहे ," अशी  टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारनामाशी बोलताना व्यक्त केली.

हा अर्थसंकल्प म्हणजे लोकांच्या तोंडाला पानं पुसण्याचा कार्यक्रमकच असल्याचेही मुंडे म्हणाले.

" राज्य सरकारने दोन्ही सभागृहगात हा चौथा अर्थसंकल्प सादर केला. पण यामध्ये कुठल्याही योजनांवर भरीव तरतूद पहायला मिळाली नाही. तसेच काही योजना 2022 मध्ये तर काही 2025 मध्ये पुर्ण होतील अशा स्वरूपाची माहिती अर्थराज्य मंत्री दिपक केसरकर यांनी दिल्यामुळे हा अर्थसंकल्प किती तोकडा  आहे हे स्पष्ट होत असल्याचे मुंडे म्हणाले. 

तसेच आर्थिक पाहणी अहवालातून सरकारचे अपयश समोर आले आहे. कृषी उत्पादन 7 लाख मेट्रीक टनाने घटले आहे. त्यामुळे आघाडी सरकारच्या काळातील विकासदराची बरोबरीही या सरकारला गाठता आली नसल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांचा स्वाभिमान आणि सन्मान या सारख्या मोठ्या शब्दातून शेतकऱ्यांचं काहीही भले होणार नसल्याचेही मुंडे मुंडे म्हणाले. एकूणच काय तर जनतेच्या हिताचे आणि आर्थिक शिस्तीचे राज्य चालविण्यात हे सरकार पुर्णपणी अपयशी ठरल्याचे आजच्या अर्थसंकल्पातून उघड झाले आहे.

संबंधित लेख