ncp demond protection to jitendra awhad | Sarkarnama

जितेंद्र आव्हाडांना झेड प्लस सारखे संरक्षण द्या, राष्ट्रवादीची मागणी

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

पुणे : जितेंद्र दाभोलकर, मुक्ता दाभोलकर आणि हमीद दाभोलकर यांच्या जीवाला धोका असल्याने सरकारने त्यांना पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील जेष्ठ नेते छगन भुजबळ, अजित पवार आदी नेत्यांनी फडणवीस यांची भेट घेऊन तिघांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. काही कथित संघटनांकडून या तिघांना धमकी देण्यात येत आहे. जितेंद्र आव्हाड हे तर सातत्याने सनानत, शिवप्रतिष्ठान आदी संघटनांविरोधात टीका करीत असतात. या टीकेमुळे काही संघटनाच्या हिटलिस्टवर असताना त्यांच्या संरक्षणामध्ये कपात केली आहे. 

तसेच मुक्ता आणि हमीद हे समाज जागृतीचे काम करीत आहेत. त्यांचे अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्य सुरूच आहे. त्यांच्या जिवितालाही धोका आहे. त्यांमुळे या तिघांनाही झेड प्लससारखी सुरक्षा व्यवस्था द्यावी अशी मागणी यावेळी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने केली आहे. 

संबंधित लेख