ncp demand for aurangabad constituency | Sarkarnama

औरंगाबाद लोकसभेची जागा राष्ट्रवादीला हवी, पक्षाध्यक्ष शरद पवारांकडे पत्राद्वारे केली मागणी

सरकारनामा ब्युरो
रविवार, 9 सप्टेंबर 2018

औरंगाबाद : आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता कॉंग्रेसकडे असलेली औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीसाठी सोडवून घ्या अशी मागणी करणारे पत्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठवण्यात आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मध्य विभागातील शहराध्यक्ष इलियास किरमाणी यांनी स्पीड पोस्टाने पत्र पाठवून ही मागणी केली आहे. राष्ट्रवादीला ही जागा सुटली तर निश्‍चित विजय मिळेल असा विश्‍वास देखील या पत्रात व्यक्त करण्यात आला आहे. 

लोकसभा निवडणुकीची घोषणा अद्याप व्हायची असली तरी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मराठवाड्याची राजधानी असलेला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ गेल्या वीस वर्षांपासून शिवसेनेकडे आहे. आघाडीमध्ये ही जागा कॉंग्रेसकडे असली तरी या पक्षाला इथे सातत्याने पराभव पत्करावा लागला. त्यामुळे 2019 मध्ये औरंगाबाद लोकसभेची जागा राष्ट्रवादीला मिळावी असा मतप्रवाह राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. 

या पार्श्‍वभूमीवर मध्य विभागातील शहर अध्यक्ष इलियास किरमाणी यांनी नुकतेच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र पाठवून औरंगाबादची जागा कॉंग्रेसकडून राष्ट्रवादीसाठी मागून घ्या अशी मागणी केली आहे. या पत्रात शिवसेनेच्या वीस वर्षाच्या काळात शहराचा विकास रखडला, आशिया खंडात झपाट्याने प्रगती करणारे शहर अशी ओळख असेल्या औरंगाबादचे नाव आता कचऱ्याचे व खड्ड्यांचे शहर म्हणून बनली आहे. कधी काळे उद्योगांची भरभराट होती, पण सोयी सुविधा मिळत नसल्याने अनेक मोठे उद्योग दुसऱ्या शहरांमध्ये गेले असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या विरोधात तीव्र संताप आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसशी आघाडी करून औरंगाबादची जागा राष्ट्रवादीकडे घ्यावी. वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्‍न आणि रखडलेला विकास यामुळे या मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार निश्‍चित विजयी होऊ शकतो असा दावा देखील या पत्रातून करण्यात आला आहे. 

संबंधित लेख