राष्ट्रवादीचे नगरसेवक सुभाष जगताप व पत्नी उषा यांना बेहिशेबी मालमत्तेबद्दल अटक व सुटका

राष्ट्रवादीचे नगरसेवक सुभाष जगताप व पत्नी उषा यांना बेहिशेबी मालमत्तेबद्दल अटक व सुटका

पुणे : नगरसेवकपदाचा पदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोषारोपपत्र शुक्रवारी दाखल केले. यावेळी पोलिसांनी जगताप दांपत्याला अटक केली. दुपारी त्यांची जामीनावर सुटका झाली. त्यांनी एक कोटी 33 लाख 39 हजार 592 रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमविली, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. 

नगरसेवक पदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक सुभाष जगताप, त्यांची पत्नी व तत्कालीन नगरसेविका उषा यांच्याविरुद्ध 4 मार्च 2015 रोजी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचे दोषारोपत्र उपअधीक्षक कांचन जाधव यांनी शुक्रवारी विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात दाखल केले.

यावेळी सुभाष आणि उषा यांना अटक करण्यात न्यायालयात हजर करण्यात आले. जगताप हे 1995 पासून 2016 पर्यंत नगरसेवक होते. सध्या ते स्वीकृत नगरसेवक आहेत. त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा त्यांच्याकडे एक कोटी 33 लाख 39 हजार 592 रुपयांची अधिक मालमत्ता आढळून आली आहे. तिचा हिशेब त्यांना सादर करता आलेला नाही, असे पोलिसांनी न्यायालयात म्हटले आहे. जगताप दांपत्याने जामीनासाठी ऍड. एन. डी. पवार यांच्यामार्फत अर्ज दाखल केल्यावर न्यायालयाने तो मंजूर केला. 

याबाबत सुभाष जगताप म्हणाले, ""माझ्या सर्व संपत्तीची माहिती प्राप्तीकर विभागाला सादर केलेली आहे. त्याचा करही भरलेला आहे. जुन्या मिळकतींची बाजारमूल्याने वाढ गृहित धरून पोलिसांनी तपासात अपसंपदेचा ठपका माझ्यावर ठेवला आहे. तो चुकीचा आहे. त्याबाबत न्यायालयात मी माझे म्हणणे सादर करणार आहे. पोलिस तपासात झालेल्या चुका झाकण्यासाठी माझ्यावर हे कुंभाड रचण्यात आले आहे.'' 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com