तहसीलदार राजश्री अहिररावांच्या राजकीय बदलीविरोधात राष्ट्रवादी, कम्युनिस्ट एकत्र 

नाशिकच्या तहसीलदार राजश्री आहिरराव-गांगुर्डे यांची बदली हेतुपुरःस्सर असून, अधिकारी सेवाहक्क मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारी आहे, असे सांगत ही बदली रद्द करावी, यासाठी तालुक्‍यातील विविध गावांतील ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले आहे
तहसीलदार राजश्री अहिररावांच्या राजकीय बदलीविरोधात राष्ट्रवादी, कम्युनिस्ट एकत्र 

नाशिक : तहसीलदार राजश्री अहिरराव यांची देवळाली विधानसभा निवडणुकीतील इच्छुक उमेदवार अशी चर्चा होती. त्यांची बदली झाल्याने राजकीय पक्षांचे विविध नेते त्यांच्या बाजुने उभे रहात आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि कम्युनिस्ट या एकमेकांच्या कट्टर विरोधकांनी त्यासाठी धावाधाव करीत निवेदन दिले. स्वतः अहिरराव यांनी मात्र याबाबत प्रतिक्रीया देण्यास नकार दिला आहे. 

नाशिकच्या तहसीलदार राजश्री आहिरराव-गांगुर्डे यांची बदली हेतुपुरःस्सर असून, अधिकारी सेवाहक्क मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारी आहे, असे सांगत ही बदली रद्द करावी, यासाठी तालुक्‍यातील विविध गावांतील ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य हिरामण खोसकर, करण गायकर, तुषार जगताप, राजू देसले, गणेश कदम, शिवा तेलंग, शिवाजी मोरे, संतोष माळोदे, विकास काळे, तानाजी गायकर, विक्की थेटे, पंचायत समिती सदस्य ढवळू पसारे, कैलास बेंडकुळे, अनिल जगताप, दीपक वाघ, बाळासाहेब मस्के, राहुल पाटील, चेतन शेलार, तुषार गवळी, मनोरमा पाटील, विलास कांडेकर, विलास ठिळे, सोमनाथ मुंडे, अॅड. अरुण खांडबहाले, अनिल मोंढे, गंगाधर वळवे यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना निवेदन दिले. ही बदली राजकीय नेत्यांनी प्रशासनावर आणून केली असून ती बदली रद्द करावी, अन्यथा आंदोलन करु असा इशारा यावेळी देण्यात आला.  

तहसीलदारांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी सोमवारी किसान सभेचे राजू देसले यांनीही पुढाकार घेतला आहे. किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना निवेदन दिले. तहसीलदार गांगुर्डे यांनी आदिवासी- बिगरआदिवासींना मोठ्या प्रमाणावर नाशिक तालुक्‍यात रेशनकार्ड बदलून दिल्याने गोरगरिबांना शासकीय योजनांचे लाभ मिळत आहेत. त्यामुळे त्यांची बदली रद्द करावी. असे निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाचे यावर एकमत झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com