NCP AND SHIVSENA WORKERS AT WAR ON SOCIAL MEDIA | Sarkarnama

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणतात आमचं ठरलयं....तर शिवसैनिकांच म्हणणं आमचं आधीच ठरलयं

सुदाम बिडकर
रविवार, 14 एप्रिल 2019

पारगाव : शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीचा बनू लागली आहे. शिवसेना- भाजप महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व राष्ट्रवादी व कॉग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे या दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रचारयंत्रणा राबविली जात आहे.

नेटकऱ्यांकडून सोशल मिडीयावर कल्पक पोस्टचा पाऊस पडत आहे. त्यातुन अनेक गमतीजमती पाहावयास मिळत आहेत. दोघांचेही सोशल मिडीयारील कार्यकर्ते विरोधी उमेदवारावर टपूनच असतात.

आपल्याला कोणता फोटो मिळतो आणि त्यातुन समोरच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कशाप्रकारे गैरसमज पसरविता येईल व त्यातुन आपल्या पक्षाचा फायदा कसा फायदा होईल हे पाहीले जात आहे.

आज रविवारी अशाच प्रकारे डॉ. अमोल कोल्हे भोसरी परिसरात प्रचाराला असताना भाजपाचे आमदार महेश लांडगे यांची भेट झाली आणि दोघांचा हस्तांदोलन करतानाचा फोटो व्हायरल झाला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यावर लगेच " आमचं ठरलयं " असा कॅचलाइन टाकुन आजची 14 तारीख नोंदवून तो फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केला.

यावर शिवसेनेचे कार्यकर्ते गप्प बसतील कसे बसतील? त्यांनीही लगेच काल 13 तारखेला आंबेगाव तालुक्यातील नांदुर येथे रामनवमीच्या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व राष्ट्रवादीचे नेते आमदार दिलीप वळसे पाटीलही या वेळी हजर होते. त्यांचाही शेजारी शेजारी उभे असलेला फोटो शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल करुन त्यावर स्लोगन टाकलय " आमचं तुमच्या आधीच ठरलयं " तारीख टाकली आहे 13 एप्रिल. या दोन्हीही फोटोंमुळे नेटीझन्सची मोठी करमणूक झाली. 

संबंधित लेख