ncp and congress start campaign against bjp government | Sarkarnama

राष्ट्रवादीचे रायगडावरून तर काॅंग्रेसचे दीक्षाभूमीतून भाजपविरोधी रणशिंग

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 10 जानेवारी 2019

दोन्ही काॅंग्रेसने भाजप सरकारच्या विरोधातील लढा पुन्हा तीव्र केला.

पुणे : काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस या दोन्ही पक्षांनी महाराष्ट्राच्या दोन टोकांवरून भाजप सरकारविरोधात रणशिंग फुंकले.
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज भाजप सरकारच्या विरोधातील लढा सुरू केला. काॅंग्रेस नेत्यांनी नागपूर येथील दीक्षाभूमीला अभिवादन करून संघर्ष यात्रेचा पाचवा टप्पा सुरू केला. 

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधी मंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री गणेश नाईक, अनिल देशमुख, आमदार अनिकेत तटकरे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, आमदार विदया चव्हाण, आमदार पांडुरंग बरोरा, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी आमदार जयदेव गायकवाड, आदींसह पक्षाचे इतर सर्व नेते उपस्थित होते.

नागपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याचा प्रारंभ करण्यात आला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय महासचिव मुकूल वासनिक, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री आ. नसीम खान, आ. विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, माजी मंत्री अनिस अहमद, नागपूरचे काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते या वेळी उपस्थित होते.
 

संबंधित लेख