ncp and bjp | Sarkarnama

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून गाजर हलवा वाटून निषेध

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

परळी : भाजपचे सरकार सत्तेवर आले तर प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा होतील असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. मात्र, अद्याप तर कोणाच्या खात्यात पंधरा रुपयेही जमा झाले नाहीत. मधल्या काळात तर भाजपच्या नेत्यांनी " असे आश्वासन दिल्याचा व्हिडीओ असेल तर द्या' असे आव्हान दिले होते. मात्र, घोषणेप्रमाणे खात्यात रक्कम जमा झाली का, याची उलटतपासणी गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली. मात्र, बॅंक खाते तपासून पाहीले तर घोर निराशा झाली. मग, खोट्या घोषणेचा निषेध करत यावेळी गाजर हलवाही वाटण्यात आला. 

परळीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने "बॅलन्स चेक करो' आंदोलन केले. यावेळी व्यंगात्मक गाजर हलवा वितरणही करुन सरकारची खिल्ली उडविली. आंदोलनात बॅंकेत जाऊन पासबुक एन्ट्री करून पंधरा लाख खरेच जमा झाले का? अशी उलट तपासणी करणारे आंदोलन केले. सरकारच्या फसव्या आश्वासनांचे व्यंगात्मक गाजर हलवा वितरण करुन निषेध करण्यात आला. आंदोलनातून सरकारची फसवेगिरी दाखविण्याचा प्रयत्न झाला. आंदोलनस्थळी "या मोदीने केलिया नोटबंदी, कल्लोळाच पाणी कशाला ढवळील सामान्य नागरिकला कशाला खवळील' अशी गीते गायली. आंदोलनात बन्सीधर सिरसाट, युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, चंदुलाल बियाणी, दिपक देशमुख आदींनी सहभाग घेतला. 

संबंधित लेख