ncp ajit pawar | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

राष्ट्रवादीच्या मेळाव्यात ज्येष्ठांना कानपिचक्‍या तरुणांना प्रोत्साहन

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 8 जुलै 2017

नगर : राष्ट्रवादी कॉग्रेसच्या मेळाव्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांची बॅटरी चांगलीच चार्ज केली. जुन्यांना नीट काम करा, अथवा पदे सोडा असा सज्जड दम देत पक्षात युवकांना चांगली संधी देणार असल्याचे संकेत दिले. आगामी काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसची बांधणी युवक केंद्रीत असल्याचे संकेत अजितदादांनी आपल्या भाषणातून दिले. 

नगर : राष्ट्रवादी कॉग्रेसच्या मेळाव्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांची बॅटरी चांगलीच चार्ज केली. जुन्यांना नीट काम करा, अथवा पदे सोडा असा सज्जड दम देत पक्षात युवकांना चांगली संधी देणार असल्याचे संकेत दिले. आगामी काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसची बांधणी युवक केंद्रीत असल्याचे संकेत अजितदादांनी आपल्या भाषणातून दिले. 

नगरमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसचा मेळावा झाला. मेळाव्यात संघटना बांधणीच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना सुचवण्यात आल्या, काहींवर विचार झाला, तरी जुन्या-नव्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न या मेळाव्यात प्रयत्न झाला. महिला आघाडी, युवक आघाडीत केलेले बदल व तरुणांचा उत्साह मेळाव्यात जाणवत असला, तरी जुन्यांची झालेली कानउघाडणी मेळाव्याचे वैशिष्ट्य ठरले. 

जिल्हाध्यक्ष घुलेंना अभय 
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाबाबत मध्यंतरी उठलेले वादळ या मेळाव्याने शमले. अजित पवार यांनी आगामी काळातही चंद्रशेखर घुले हेच जिल्हाध्यक्ष राहतील, असे ठणकावून सांगितल्याने या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. नेवासे तालुक्‍यातील गडाख कुटुंबियांनी राष्ट्रवादी सोडत वेगळी चूल मांडल्याचा पवार यांनी समाचार घेतला. पक्षाची ताकद तिथे कमी झाली असली, तरी घुलेंना चांगले काम करण्याचा सल्ला दिला. जिल्हाध्यक्षपदासाठी सुजित झावरे यांचे नाव घेतले जात होते. मात्र झावरे यांना पवार यांनी फटकारले. स्वभाव बदलून कधी तरी मनाचा मोठेपणा दाखविला पाहिजे, असा सल्ला झावरे यांना दिला. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदाच्या वादाला पूर्णविराम मिळाला आहे. 

पाचपुतेंच्या पराभवाचे उदाहरण 

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठरविले, तर ते काहीही करू शकतात, हे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले. त्याला बबनराव पाचपुते यांच्या पराभवाचे उदाहरण दिले. त्यांना पालकमंत्री केले. मंत्रिपदे दिली. प्रदेशाध्यक्षपद दिले, तरीही ते सोडून गेले. मग राष्ट्रवादीने नागवडे, जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांना एकत्र करून त्यांचा पराभव केला. राहुल जगताप यांना आमदार केले. भाजपची हवा असतानाही कसा चमत्कार घडविला, याचे उदाहरण नवयुवकांना उर्जा देणारे ठरले. 

जुन्या नेत्याला फटकारले 
ज्येष्ठ नेते दादा कळमकर यांना  उमेदवारी मिळणार नाही, असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितल्याने कळमकर यांचा पत्ता आता कट झाल्यात जमा आहे. अनेकवेळा उमेदवारी देऊनही कारकीर्द गाजविता आली नाही. त्यामुळे त्यांनी आता वडीलकीचाच सल्ला द्यावा, असे कळमकर यांना ठणकावून सांगितले. 

शेती आणि कामगार हाच अजेंडा 
राष्ट्रवादीची नव्याने पक्ष बांधणी करताना शेतकरी आणि कामगार हाच आपला अजेंडा राहणार आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या 24 आघाड्यांचे पदाधिकारी नेमण्यात येणार आहेत. त्यात विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी 22 ते 25 वयोगटातील असेल. युवक राष्ट्रवादीचा पदाधिकारी 27 ते 32 वयोगटातील असेल. असे नेत्यांनी सांगून युवक आघाडीतल्या अनेक इच्छुकांचा पत्ता कट केला. आगामी काळात शेती आणि कामगार हाच अजेंडा असल्याने त्यांच्या प्रश्नांवर राजकारणाची बांधणी अवलंबून असल्याचे सुतोवाच नेत्यांनी केले. 

संबंधित लेख