ncp agitation in mumbai | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

घरपोच दारू महेंगा तेल...!', राष्ट्रवादीचे एल्गार आंदोलन

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

मुंबई : "वाह रे मोदी तेरा खेल... घरपोच दारू महेंगा तेल...!', "मोदी सरकार हाय हाय', "सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है', "महागाई रद्द झालीच पाहिजे', "लोडशेडिंग रद्द झालेच पाहिजे' अशी जोरदार घोषणाबाजी करत मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजप कार्यालयासमोर आज जोरदार निदर्शने केली. 

या वेळी महिला कार्यकर्त्यांनी सोबत आणलेली गाजरे भाजप कार्यालयावर भिरकावत सरकारच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. आमदार विद्या चव्हाण, महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुंबई अध्यक्षा सुरेखा पेडणेकर आणि पक्षाच्या मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

"राष्ट्रवादी'चे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली आज अचानक करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करून पोलिस व्हॅनमध्ये टाकून पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तिथेही या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामध्ये माजी आमदार अशोक धात्रक, प्रदेश प्रवक्ते क्‍लाईड क्रास्टो यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. 
 
संबंधित लेख