ncp agitation in mumbai | Sarkarnama

एल्फिन्स्टनप्रकरणी राष्ट्रवादीची निदर्शने

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

मुंबई : एल्फिन्स्टन स्थानकावर चार दिवसापूर्वी झालेल्या दुर्घटनेविरोधासोबतच मोदी सरकारच्या धोरणाविरोधात आज राष्ट्रवादी कॉंग्रेसने सकाळी चर्चगेट स्थानक आणि ठाणे जिल्ह्यात कळवा स्थानकावर मोदी विरोधात घोषणाबाजी देत परिसर दणाणून सोडला. 

मुंबई : एल्फिन्स्टन स्थानकावर चार दिवसापूर्वी झालेल्या दुर्घटनेविरोधासोबतच मोदी सरकारच्या धोरणाविरोधात आज राष्ट्रवादी कॉंग्रेसने सकाळी चर्चगेट स्थानक आणि ठाणे जिल्ह्यात कळवा स्थानकावर मोदी विरोधात घोषणाबाजी देत परिसर दणाणून सोडला. 

मरणासन्न असलेल्या मुंबईतील लोकल ट्रेनसाठी सर्वसामान्यांचा आवाज सरकार ऐकत नाही , त्यांना केवळ बुलेट ट्रेन आणि त्यातून होणारा भांडवलंदारांचा फायदा दिसत असल्याने त्याविरोधात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सकाळी 9 च्या सुमारास कळवा स्थानकावर निदर्शने करून आपला संताप व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या ठाणे शहर जिल्ह्याकडून करण्यात आलेल्या या आंदोलनात राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यासोबत कामावर निघालेल्या असंख्य प्रवाशांनी या आंदोलनात सहभाग घेतला यामुळे कळवा स्थानकातून सकाळी 9 नंतर काही वेळ आंदोलकांनी लोकलही रोखून धरल्या होत्या. 

चर्चगेट स्थानकावर राष्ट्रवादीच्या महिला प्रमुख चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 10.30 वाजता निदर्शनाला सुरवात झाली. यात मुंबईसह राज्यातील राष्ट्रवादीच्या महिला प्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोदी सरकार हाय हाय, अशा घोषणांनी चर्चगेट स्थानक दणाणून गेले. तब्बल दोन तासाहून अधिक काळ चाललेल्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर पश्‍चिम रेल्वेने प्रवास करणारे प्रवासीही सहभागी होईन त्यांच्याकडूनही एल्फिन्स्टन स्थानकावर झालेल्या दुर्घटनेस मोदी सरकार आणि रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचे सांगण्यात आले. 

दरम्यान, मुंबईतील 22 प्रवाशाचा चेंगरून मृत्यू होत असताना भाजपचे नेते दांडिया तर शिवसेनेचे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर मेजवानी देत फूटबॉल खेळत होते, याचा यावेळी तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला. आंदोलकांची घोषणाबाजी सुरु असतानाच पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक केली. 

संबंधित लेख