NCP accepts responsibility of children's of sucide commited farmers | Sarkarnama

राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वीकारणार शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांची जबाबदारी 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 10 जून 2017

डोक्‍यावर असलेला कर्जाचा डोंगर फेडण्याची चिंता आणि सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र वाढतच आहे. अशा कठीण प्रसंगी सामाजिक बांधिलकी जोपासत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुला-मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. 

अकोला : डोक्‍यावर असलेला कर्जाचा डोंगर फेडण्याची चिंता आणि सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र वाढतच आहे. अशा कठीण प्रसंगी सामाजिक बांधिलकी जोपासत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुला-मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसने नेहमीच राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व दिले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्‍न असो किंवा समाजातिल उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी आघाडीवर असतात. शेती व शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नावर राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाचा 19 वा वर्धापनदिन साजरा करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रत्येक जिल्ह्यात पाच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुला-मुलींच्या माध्यमिक शिक्षणापर्यंत जबाबदारी स्वीकारण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यातही अशा कुटुंबांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींच्या शिक्षणाचा खर्च राष्ट्रवादी कॉंग्रेस उचणार आहे. त्यासाठी पक्षाच्या जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांसह, पदाधिकारी, जिल्ह्याचे प्रभारी नेते यांच्याकडून निधी संकलीत करण्यात आला आहे. 
 

संबंधित लेख