ncp | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

राष्ट्रवादीचा आता संघटनात्मक बांधणीवर भर

संजीव भागवत
गुरुवार, 11 मे 2017

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये संमिश्र मिळवलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने आता राज्यभरात पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर भर देण्याचा कार्यक्रम आखला आहे.

गाव-खेड्यापासून ते शहरी भागापर्यंतची पक्षाची पकड पुन्हा मजबूत करण्यासाठी अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचे, दौऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून त्याची सुरूवात राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या दिवशी 10 जून रोजी केली जाणार आहे.

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये संमिश्र मिळवलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने आता राज्यभरात पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर भर देण्याचा कार्यक्रम आखला आहे.

गाव-खेड्यापासून ते शहरी भागापर्यंतची पक्षाची पकड पुन्हा मजबूत करण्यासाठी अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचे, दौऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून त्याची सुरूवात राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या दिवशी 10 जून रोजी केली जाणार आहे.

या दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे प्रमुख नेते मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. यासाठी गुरूवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख व माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील सर्व राष्ट्रवादीचे आमदार, खासदारांसापासून ते प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईत दोन आढावा बैठका झाल्या. त्या बैठकांमध्ये यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरूवारी राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा येत्या 10 जून रोजी वर्धापन दिन असून या निमित्ताने राज्यव्यापी कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. त्यामुळे 11 जूनपासून राष्ट्रवादीकडून राज्यव्यापी दौऱ्यांचे आयोजन केले जाणार आहे. यात प्रत्येक जिल्ह्यांमध्ये बैठका घेतल्या जाणार असून युवक आघाडी, महिला विविध प्रकारच्या सेलच्या नियुक्‍त्या, त्यातील फेरबदलही केले जाणार आहेत. तर त्यासोबतच स्थानिक स्तरावरील असलेले प्रश्‍न, तेथील राजकीय परिस्थिती समजून घेउन त्यासाठीची भूमिकाही स्पष्ट केली जाणार असल्याची माहितीही तटकरे यांनी दिली. 

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत चर्चा झालेल्या विषयाचीही तटकरे यांनी माहिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडून आलेल्या जिल्हा परिषद, नगरपंचायत, पंचायत समितीच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून त्यांचे प्रश्‍न समजून घेण्यात आले असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

जुलैमध्ये राज्याच्या सहा महसुली विभागात राष्ट्रवादीकडून वेगवेगळया ठिकाणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले असून ही शिबीरे प्रत्येक ठिकाणी विभागीय पातळीवर होतील.यात स्थानिक स्तरावरील प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी विधानमंडळापर्यंतचा कार्यक्रम आखला जाणार असल्याचेही तटकरे यांनी सांगून पक्षाकडून प्रादेशिक भागात एक लोकचळवळ उभी केली जाणार असून यात महिला, युवकांना मोठया प्रमाणात सामील करून घेतले जाणार असल्याचेही ते म्हणाले. 
 

संबंधित लेख