Nayana Gavit Appointed and Youth Congrerss General Secretary | Sarkarnama

युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नाशिकच्या नयना गावित

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 26 जानेवारी 2019

येथील  जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा आणि विविध उपक्रमात आघाडीवर असणा-या युवा नेत्या नयना गावित यांची युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी प्रदेश कार्यकारिणीचा विस्तार केला आहे.

नाशिक : येथील  जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा आणि विविध उपक्रमात आघाडीवर असणा-या युवा नेत्या नयना गावित यांची युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी प्रदेश कार्यकारिणीचा विस्तार केला आहे. यामध्ये राज्यातील बारा युवकांचा सरचिटणीस  म्हणून समावेष केला आहे.

कार्यकारिणीत जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा आणि उत्तर महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या समन्वयक नयना गावित यांचाही समावेश आहे. नयना गावित यांनी इगतपुरी त्रंबकेश्वरच्या आमदार निर्मलाताई गावित यांच्या विकासाचा पाढा गिरवत आपल्या कुशल नेतृत्वाने राजकारणात दमदार एन्ट्री केली आहे.  सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात. जिल्ह्यात पक्षाचा संघटनात्मक बांधणीवर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित लेख