nayana gavit | Sarkarnama

नाशिक झेडपीच्या उपाध्यक्षा नयना गावितांचे उद्या शुभमंगल

संपत देवगिरे ः सरकारनामा
बुधवार, 10 मे 2017

नाशिक ः जिल्हा परिषदेच्या युवा उपाध्यक्षा कुमारी नयना गावित उद्या (ता.11 विवाहबंधनात अडकत आहेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या इतिहासत पहिल्यांदाच पदावर असतांना विवाह होत आहेत. या विवाहाची त्यांच्या कुुटंबियांकडून धुमधडाक्‍यात तयारी सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रातही तो जारदार चर्चेचा विषय ठरला आहे. 

नाशिक ः जिल्हा परिषदेच्या युवा उपाध्यक्षा कुमारी नयना गावित उद्या (ता.11 विवाहबंधनात अडकत आहेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या इतिहासत पहिल्यांदाच पदावर असतांना विवाह होत आहेत. या विवाहाची त्यांच्या कुुटंबियांकडून धुमधडाक्‍यात तयारी सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रातही तो जारदार चर्चेचा विषय ठरला आहे. 

विवेक राजेंद्र मिश्रा हे मूळचे विरार (मुंबई) येथील आहेत. मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात हे दोघेही एम.बी.ए. चे शिक्षण घेत असतांना त्यांचा परिचय झाले. या परिचयाचे रुपांतर स्नेहात आणि त्यातून आता त्यांचा विवाह होत आहे. विवेक याला व्यवसायात अधिक रस तर नयना यांना दिर्घ राजकीय, सामाजिक वारसा लाभला असल्याने सार्वजनिक कामात त्यांना रस आहे. विवेकचा मिडीया व जाहिरातीचा व्यवसाय असून गोरेगाव येथे त्यांचे कार्यालय आहे. नयना या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा असल्याने त्यांना पूर्णवेळ सामाजिक, राजकीय काम करावे लागणार आहे. त्यामुळे मुंबईत व्यवसाय असलेला विवेकशी विवाह होत असल्याने नयना गावित सासरी राहून नाशिकचे कामकाज बघणार की पती विवेक सासरी मुक्कामी येणार याची उत्सुकता आहे. त्याबाबत नयना गावित यांनी मात्र काहीच ठरवलेले नाही. "त्याचा निर्णय विवाहानंतर घेऊ' अशा मोजक्‍या शब्दात त्यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली. 

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून सलग नऊ वेळा कॉंग्रेस पक्षाचे खासदार राहिलेल्या माणिकराव गावित यांच्या नात तर इगतपूरीच्या आमदार निर्मला आणि पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश गावित यांच्या कन्या असलेल्या नयना यांनी मुंबईत नुकतीच पदवी संपादन केली आहे. त्यानंतर नुकत्याच झालेल्या निवडणूकीत वाडीवऱ्हे गटातून त्या कॉंग्रेसची उमेदवारी घेऊन निवडून आल्या. त्यानंतर लगेचच जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची धुराही त्यांच्याकडे आली. त्यामुळे अतिशय कमी वेळात राजकीय कारकिर्द बहरलेल्या नयना गावित यांना त्याची आवडही आहे. इगतपुरी या धरणांच्या तालुक्‍यात पाण्यापासून वंचीत असलेल्या आदिवासींना त्यांनी शासकीय खर्चातुन उपसा सिंचन योजना राबवुन शेकडो आदिवासींची शेती बागाईती केली. देवमोगरा माता सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर व इगतपुरीत केलेल्या या कामाने सबंध परिसराचा कायापालट झाला होता. 

संबंधित लेख