नवाज शरीफ आणि कन्या मरियम यांच्या शिक्षेला न्यायालयाची स्थगिती 

एवेनफील्ड प्रोपर्टीजप्रकरणात दोषी ठरल्यानंतर पाकिस्तान मधील निवडणुकांपूर्वी नवाज शरीफ यांना तुरुंगात टाकण्यात आले होते.
nawaz & daughter
nawaz & daughter

इस्लामाबाद  :  पाकिस्तानचे माजी पंतप्रधान  नवाज शरीफ, त्यांची कन्या मरियम आणि जावई कॅप्टन मोहम्मद यांच्या शिक्षेला इस्लामाबाद हायकोर्टाने स्थगिती दिली  आहे.

एवेनफील्ड प्रोपर्टीजप्रकरणात दोषी ठरल्यानंतर पाकिस्तान मधील  निवडणुकांपूर्वी नवाज शरीफ यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. 

इस्लामाबाद हायकोर्टाच्या खंडपीठातील न्यायाधीश अतहर मिनाल्लाह आणि न्या. हसन औरंगजेब यांनी आपल्या आदेशात नवाज शरीफ , त्यांच्या कन्या मरियम व जावई कॅप्टन मोहम्मद यांची शिक्षा स्थगित करण्याचे बजावले आहे. एवेनफील्ड प्रोपर्टीज प्रकरणात न्यायालयाने 6 जुलै रोजी निर्णय देता शरीफ यांना दोषी ठरवले होते. 

शरीफ यांच्या कुटुबीयांचे लंडनमध्ये चार अत्यंत आलिशान फ्लॅट आहेत, असाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. पाकिस्तानमधील निवडणुकांपूर्वी  नवाझ शरीफ यांनी मरिअमसह पोलिसांसमोर शरणागती पत्करली. त्यानंतर, त्यांना रावळपिंडी येथील कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यावेळी, नवाज शरीफ यांना 10 वर्षांची, मरयम यांना 7 वर्षांची तर कॅप्टन सफदर यांना 1 वर्षांची सजा सुनावण्यात आली होती. 

पीएमएल-एन पक्षाचे प्रमुख नवाज यांच्या परिवाराने आणि कॅ. सफदर यांनी कोर्टाच्या निर्णयाला इस्लामाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अकाउंटिबिलिटी कोर्टाच्या निर्णयाच्या वेळी नवाज शरीफ लंडनमध्ये होते. तेथे त्यांची पत्नी कुलसुमवर उपचार सुरू होते. नवाज आणि त्यांची मुलगी कोर्टाच्या आदेशानंतर पाकिस्तानात परतले. तेव्हा लाहोर येथे त्या दोघांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आले होते .    ११ सप्टेंबर रोजी नवाझ शरीफ यांच्या पत्नी कुलसुम यांचे निधन झाले. त्यानंर्र नवाज शरीफ आणि मरयम यांची पॅरोलवर सुटका करण्यात आली होती . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com