nawaj sharifs buffelo sell | Sarkarnama

नवाज शरीफ यांनी पाळलेल्या म्हशीचा लिलाव होणार 

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

इस्लामाबाद : पाकिस्तान पंतप्रधान निवासस्थानात माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाळलेल्या आठ म्हशींचा लिलाव करण्यात येणार आहे. 

पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या अडचणीत असून, अवांतर सरकारी खर्च कमी करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान इम्रान खान सरकारने अभियान सुरू केले आहे. याअंतर्गत म्हशींची विक्री केली जाणार आहे, तसेच 80 हून अधिक सरकारी आलिशान गाड्याही विक्रीस काढण्यात येणार आहेत. 

पंतप्रधानांचे राजकीय सल्लागार नईम उल हक म्हणाले, की पंतप्रधान निवास स्थानात असलेल्या महागड्या गाड्यांची विक्री केली जाणार आहे. तसेच कॅबिनेट डिव्हिजनमध्ये वापराविना धुळखात पडलेल्या चार अतिरिक्त हेलिकॉप्टरचीदेखील विक्री केली जाणार आहे. आठ म्हशींची लवकरच विक्री केली जाणार असून, त्याच्या संभाव्य खरेदीदारांना तयार राहण्यास सांगितले आहे. 

संबंधित लेख