nawab malik ncp | Sarkarnama

शेतकरी संपावेळी भाजपकडून व्यापाऱ्यांना पंचतारांकित पार्टी - नवाब मलिक

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 जून 2017

मुंबई : आपल्या न्याय मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरुन आंदोलन करीत असताना राज्यात व केंद्रात सत्तेत असणारा भारतीय जनता पक्ष मात्र या शेतकरी आंदोलनाबाबत असंवेदनशील असल्याचे दिसून आले असून केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत भारतीय जनता पक्षाने व्यापाऱ्यांना ग्रॅंड हयात या पंचतारांकित हॉटेल मध्ये सरकारला सत्तेत 3 वर्षे पूर्ण झाल्या बद्दल जंगी पार्टी दिली असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजपचे प्रमुख पदाधिकारी या पार्टीला उपस्थित होते असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, एकीकडे राज्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, शेतकरी संपाच्या माध्यमातून आपला आक्रोश व्यक्त करत आहेत आणि दुसरीकडे भाजपचे लोक पार्ट्या करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यांचं काम करत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कार्यकर्ते अधिकतर शेतकरी कुटुंबातील असल्याने ते शेतकरी संपात आपला सहभाग नोंदवत आहेत पण भाजप हा शेतकऱ्यांचा माल लुटणारा आणि व्यापाऱ्यांचं हित जोपासणारा पक्ष आहे अशी घणाघाती टीका त्यांनी भाजपवर केली. 

संबंधित लेख