भाजपला मदत करण्यासाठी दाऊद बाबतची चर्चा : नवाब मलिक

भाजपला मदत करण्यासाठी वारंवार दाऊद बाबतची चर्चा समोर आणली जात आहे असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर दाऊदला परत आणण्यास विरोध केल्याचे वक्तव्य केले. त्यावर प्रतिक्रिया देताना मलिक यांनी वरील प्रतिपादन केले.
भाजपला मदत करण्यासाठी दाऊद बाबतची चर्चा : नवाब मलिक

मुंबई  : भाजपला मदत करण्यासाठी वारंवार दाऊद बाबतची चर्चा समोर आणली जात आहे असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर दाऊदला परत आणण्यास विरोध केल्याचे वक्तव्य केले. त्यावर प्रतिक्रिया देताना मलिक यांनी वरील प्रतिपादन केले.

"गेली २५ वर्षे दाऊदला का भारतात आणले नाही ही चर्चा करण्यात येत आहे. परंतु शरद पवार साहेबांनी आपली स्पष्ट भूमिका यावर मांडलेली आहे. जो आरोपी फरारी आहे अशा आरोपीला शर्तीवर सरेंडर केले जात नाही. त्यावेळी सरकारने मान्यता दिली नाही. ज्या अटी राम जेठमलानी सांगत होते. त्या सरकारला मान्य नव्हत्या. त्याबाबत शरद पवार यांनी वारंवार खुलासा केला आहे. राम जेठमलानी जर सच्चे देशभक्त होते तर त्यांनी दाऊदला भेटल्यानंतर इंटरपोलला का माहिती दिली नाही. त्यानंतर राम जेठमलानी केंद्रीय मंत्री झाले. राज्यात भाजपचं सरकार आलं केंद्रात भाजपचं सरकार आहे. त्यावेळी दाऊदला सरेंडर करुन का घेतले नाही. त्यांनी या सरकारशी चर्चा का केली नाही." असे मलिक यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

''प्रकाश आंबेडकर हे २५ वर्षानंतर हा प्रश्न काढत आहेत.  वेगळी निवडणूक लढणे म्हणजे भाजपला आणि आरएसएसला मदत करण्यासारखे आहे, असे आता वंचित आघाडीच्या नेते बी. जी.कोळसेपाटील हे सांगत आहेत. असे असताना प्रकाश आंबेडकर स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. आज जो प्रश्न निर्माण करण्यात आला. तो कुणासाठी, कुणाला मदत करण्यासाठी आहे," असा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com