नवनीत कौर राणा यांचा धमाल दांडीया 

नवरात्र उत्सवात काही दिवसांनी सुरू झाल्यानंतर दांडीयाची धमाल सुरू होते. येथे दांडीया नृत्यासाठीच्या प्रशिक्षणामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री नवनीत कौर राणा यांनी ठेका धरला. यामुळे उपस्थित युवतींनाही नृत्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.
नवनीत कौर राणा यांचा धमाल दांडीया 

अमरावती : नवरात्र उत्सवात काही दिवसांनी सुरू झाल्यानंतर दांडीयाची धमाल सुरू होते. येथे दांडीया नृत्यासाठीच्या प्रशिक्षणामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री नवनीत कौर राणा यांनी ठेका धरला. यामुळे उपस्थित युवतींनाही नृत्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. 

येत्या 10 ऑक्‍टोबरला नवरात्रौत्सव सुरू होत आहे. या काळात अमरावती शहरात मोठ्या प्रमाणावर गरबा व दांडीया नृत्याची धमाल असते. यासाठी युवती व महिलांना खास प्रशिक्षण आयोजित केले आहे. अमरावतीतील हॉटेल मेहफीलमध्ये दांडीया नृत्याचेचे प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षणात प्रसिद्ध अभिनेत्री व आमदार रवि राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी हजेरी लावली व या प्रशिक्षणात सहभाग घेतला. जवळपास 15 मिनिटे नवनीत राणा यांनी प्रशिक्षणार्थी महिलांसोबत नृत्यात सहभाग घेतला. प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत नृत्य करण्याची संधी मिळाल्याने अनेक महिलांनाही आनंद झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com