नवनीत राणांनी दिले संक्रांतीचं वाण; उखाण्यातून केला रवी राणांचा प्रचार

देशभरात संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच राजकारणी लोकही त्यात उत्साहानं साजरे होत आहेत. त्यातच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्यानं तर प्रचारासाठी संक्रांतीची ही पर्वणी साधली गेली नाही तरच नवल. बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर राणा यांनीही महिलां
नवनीत राणांनी दिले संक्रांतीचं वाण; उखाण्यातून केला रवी राणांचा प्रचार

अमरावती : देशभरात संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच राजकारणी लोकही त्यात उत्साहानं साजरे होत आहेत. त्यातच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्यानं तर प्रचारासाठी संक्रांतीची ही पर्वणी साधली गेली नाही तरच नवल. बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर राणा यांनीही महिलांना संक्रांतीचं वाण देत आपल्या पतीचा प्रचार करण्याची संधी साधली.

अमरावती येथे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान महोत्सवात संक्रांती निमित्य नवनीत राणा यांनी हळदी कुंकू लावून उपस्थित महिलांना वाण दिले. यावेळी महिलांची मोठी गर्दी झाली होती. जिल्ह्यातील शेकडो महिलांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. नवनीत कौर राणा प्रत्येकीला हळदी कूंकू लावून संक्रांतीचे वाण देत होत्या. 

यावेळी उपस्थित दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या कॅमेऱ्यांसमोर नवनीत राणांनी उखाणाही घेतला. 
निळ्या निळ्या आकाशात चमचम करतात तारे
रविजींचं नाव घेते लक्ष द्या सारे.....
असं सांगत त्यांनी आपल्या पतीचा प्रचार करण्याची संधी साधली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com