Navi mumbai - Sharad Pawar | Sarkarnama

सरकारच्या कामगार धोरणावर शरद पवार यांची टीका

सुजीत गायकवाड 
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

मार्केट कायदा बदलत चालला आहे. ही कामगारांसाठी धोक्याची बाब आहे. राज्यात असुरक्षित कामगारांची संख्या वाढत चालली असून, हे गंभीर असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. सरकारवर कामगार धोरणावर शरद पवार यांनी जोरदार टीका केली. नवी मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

नवी मुंबई : मार्केट कायदा बदलत चालला आहे. ही कामगारांसाठी धोक्याची बाब आहे. राज्यात असुरक्षित कामगारांची संख्या वाढत चालली असून, हे गंभीर असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. सरकारवर कामगार धोरणावर शरद पवार यांनी जोरदार टीका केली. नवी मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले, की सरकार मार्केट कायदा रद्द करण्याच्या प्रयत्नात आहे. देशात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. जगात पेट्रोल व डिझेलचे दर कमी होत असताना देशात पेट्रोल व डिझेलचे दर वाढत आहेत. यामुळे महागाई वाढत असून त्याची झळ सर्व सामान्य कुटुंबाला सोसावी लागत आहे. याचा आपण विचार करायला हवा आपण जागरूक व्हायला हवे. राज्यातील कामगार संकटांच्या वेळेला उभे राहतात. मला माहित आहे. यावेळीला ही ते असेच उभे राहतील याची मला खात्री आहे.

संबंधित लेख