navi mumbai railway | Sarkarnama

ऐरोली कळवा नवीन रेल्वे मार्गासाठी  शिवसेना खासदार विचारे आक्रमक 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 14 जून 2017

मुंबई : ठाणे ते नवी मुंबई कार्यक्षेत्रातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी व रेल्वे प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेनेचे ठाण्यातील खासदार राजन विचारे सातत्याने प्रयत्न करत असून ऐरोली व कळवा या नवीन रेल्वे मार्गासाठी खासदार राजन विचारे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. 

मुंबई : ठाणे ते नवी मुंबई कार्यक्षेत्रातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी व रेल्वे प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेनेचे ठाण्यातील खासदार राजन विचारे सातत्याने प्रयत्न करत असून ऐरोली व कळवा या नवीन रेल्वे मार्गासाठी खासदार राजन विचारे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. 

ठाणे रेल्वे स्थानकातील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी ऐरोली- कळवा या नव्याने होणाऱ्या रेल्वे मार्गातील कामास सुरुवात न झाल्याने विचारे यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी यांच्या दालनात एका बैठीकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला रेल्वेमार्फत एम आरव्ही सी चे डायरेक्‍टर प्रोजेक्‍ट्‌स आर .एस खुराणा, चीफ प्रोजेक्‍ट मॅंनेजर परम जीत सिंग,जिल्हाधिकारी ठाणे यांचे नायक तहसीलदार नंदकिशोर देशमुख इतर अधिकारी उपस्थित होते. 

या बैठकीत सर्व प्रथम खासदार राजन विचारे यांनी या नवीन मार्गाचे भूमिपूजन डिसेंबर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होऊन देखील या कामाची सुरुवात न झाल्याची नाराजी विचारे यांनी व्यक्त केली. त्यावर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या रेल्वेच्या नवीन मार्गासाठी मफतलाल कंपनीची अंदाजे गुंठे जागा रेल्वेला देण्याचे ठरले असून या भू संपादनासाठी रेल्वे व जिल्हाधिकारी व एम एम आर डी ए यांचा संयुक्त सर्वे न झाल्याने आजतागायत हे काम रखडलेचे असल्याचे निर्दशनास आले आहे. 

ज्यांची घरे या प्रकल्पासाठी बाधित होणार आहे त्यांना एमएमआरडीच्या माध्यमातून त्यांना हक्काची घरेही दिली जाणार आहे. परंतु तेथील काही समाजकंटक झोपडपट्टीधारकांना भडकवून या प्रकल्पाला विरोध करण्यास प्रवृत्त करीत असल्याचे निदर्शनास आले . त्यावर खासदार राजन विचारे यांनी या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा नवी मुंबईतील व कल्याण बदलापूर प्रवाशांना त्याचा फायदा होणारा असल्याने जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून हा सर्वे तत्काळ करून घेण्याचे ठरले आहे .  
 

संबंधित लेख