नवी मुंबईवरील राजकीय वर्चस्वासाठी गणेश नाईक - एकनाथ शिंदे लागले कामाला

नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व भाजपच्या नेत्यांकडून एकमेकांना दिल्याजाणाऱ्या आव्हान प्रति-आव्हानांमुळे निवडणुकांआधीच नवी मुंबईचे राजकीय वातावरण तापू लागले आहे.
नवी मुंबईवरील राजकीय वर्चस्वासाठी  गणेश नाईक - एकनाथ शिंदे  लागले कामाला

नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व भाजपच्या नेत्यांकडून एकमेकांना दिल्या जाणाऱ्या आव्हान प्रति-आव्हानांमुळे निवडणुकांआधीच नवी मुंबईचे राजकीय वातावरण तापू लागले आहे.

काही दिवसांपूर्वीच झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईवर नक्की भगवा फडकणार असा पुनरुच्चार करून थेट गणेश नाईकांना आव्हान दिले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून सध्या कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्या नाईकांनी नवी मुंबईत आपलीच एकाधिकारशाही चालेल असे थेट प्रतिआव्हान शिवसेनेला दिले आहे.

गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांनी नवी मुंबईच्या राजकारणाला वेगळीच दिशा दिली आहे. नवी मुंबईची मागील दहा वर्षांची लोकसभेवरील मक्तेदारी शिवसेनेने संपवली. तर विधानसभेत राष्ट्रवादीला बेलापूर मतदारसंघात भाजपने मात दिली. या दोन्ही निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगलीच मार खावी लागल्याने राष्ट्रवादीचे सर्वे-सर्वा भूमिगत झाले होते.

 परंतू महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रवादीने नवी मुंबईतील निर्विवाद वर्चस्व दाखवुन दिले. यानंतर तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना पुन्हा पायबंद केला होता. मात्र अधिकाऱ्यांची व राजकीय नेत्यांनी लॉबिंग जुळून आल्याने मुंढेंना जावे लागले. यानंतर पुन्हा नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सार्वजनिक कार्यक्रमात वावर सुरू झाला.

 अशातच महापालिका निवडणुकीत अंर्तगत कलहाने पेटलेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यात महापालिका निवडणुकीतील निसटता विजय जिव्हारी लागल्याने पुन्हा नवी मुंबईवर सत्ता आणू असा पुनरुच्चार शिंदे यांनी केला होता.

यावर गेले अनेक दिवस मौन बाळगून बसलेल्या माजी पालकमंत्री गणेश नाईकांनी एका  कार्यक्रमात हातात भगवा घेऊन नवी मुंबईतून परत पाठवू असे बोलून नवी मुंबईत आपलीच एकाधिकारशाही चालेल असे आव्हान सेनेला दिले.

यामुळे खवळलेल्या सेनेच्या खासदार राजन विचारे यांनी एक खाजगी कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या घराकडे लक्ष द्या असा अनाहूत सल्ला नाईकांना दिला.

याच दरम्यान शिवसेनेच्या उपनेते विजय नाहटा यांनी भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्यावर नाहक टीका करून मित्रपक्षाचा राग ओढवून घेतला.

विष्णुदास भावे नाट्यगृहात झालेल्या भाजप मेळाव्या दरम्यान म्हात्रेंनी त्याचा खरपूस समाचार घेत थेट बिळातून बाहेर आलेल्या नागोबासोबत तुलना केली. यावरून चिडलेल्या नाहटांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देत म्हात्रेंच्या टिकेला पोष्टर गिरीचे नाव देऊन प्रत्युत्तर दिले.

 शिवसेनेच्या भांडणात आमदार मंदा म्हात्रे यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर टीका करून अधिकच वातावरण गरम केले आहे.

सध्या लोकसभा निवडणुका जवळ येत असल्याने नवी मुंबईत राष्ट्रवादी व शिवसेनेकडून हळदी-कुंकू व विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सत्र सुरू झाले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जनतेत जाण्याची एकही संधी राजकीय नेते सोडत नाहीत.

याच कार्यक्रमाच्या निमित्ताने भाषणात नेत्यांकडून मग आव्हाने-प्रति आव्हानांचा खेळ सुरू होतो. याने कोणालाच काही फरक पडत नसून नवी मुंबईच्या जनतेचे मात्र चांगले मनोरंजन होत असल्याच्या प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com