`डोक्यात बॅट घालून आश्विनीची हत्या केली'

अभय कुरुंदकर याने ज्या दिवशी अश्विनी बिद्रे यांची हत्या केली, त्या दिवशी त्याने अश्विनी बिद्रे यांच्या डोक्यामध्ये बॅट मारुन त्यांची हत्या केली. त्यानंतर त्याने वुड कटर मशीनच्या सहाय्याने अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचे तुकडे करुन सदर तुकडे फ्रीजमध्ये रक्त गोठविण्यासाठी ठेवल्याचे महेश पळणीकर व कुंदन भंडारी याने आपल्या कबुली जबाबात सांगितले आहे. तसेच अभय कुरुंदकर याने तीन महिन्यांपूर्वीपासूनच अश्विनी बिद्रे यांची हत्या करण्याची योजना आखून आपल्या घरामध्ये बॅट, वुड कटर मशीन, बॅग आदि साहित्य आणून ठेवल्याचेही महेश पळणीकर आणि कुंदन भंडारी यांनी सांगितले आहे.
`डोक्यात बॅट घालून आश्विनीची हत्या केली'

नवी मुंबई : अभय कुरुंदकर याने सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या करण्याची योजना तीन महिन्यापूर्वीपासून आखल्याचे; तसेच त्यासाठी त्याने बॅट, वुड कटर, बॅग व इतर वस्तु आपल्या घरात आणुन ठेवल्याचे उघडकीस आले आहे. 

अभय कुरुंदकर याने 11 एप्रील 2016 रोजी रात्री अश्विनी बिद्रे यांना आपल्या भाईंदर येथील घरामध्ये नेल्यानंतर त्यांच्या डोक्यात बॅट मारुन त्यांची हत्या केली. त्यानंतर त्याने वुड कटरच्या सहाय्याने अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचे तुकडे करुन सदर तुकडे रक्त गोठविण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवल्याची माहिती महेश फळणीकर याने आपल्या कबुली जबाबात दिली आहे.

दरम्यान, वर्षभरापूर्वी नवी मुंबई पोलिसांनी अभय कुरुंदकर याच्या घरातून जप्त केलेल्या 25 वस्तूंचा फॉरेन्सिक लॅबमधील अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. 

सदर प्रकरण दडपण्यासाठी अभय कुरुंदकर याने आपल्या पदाचा पुरेपुर वापर केल्याचे अतापर्यंतच्या तपासात आढळून आले आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी असलेल्या कुरुंदकर याने फॉरेन्सिक लॅबच्या अहवालत देखील फेरफार केले असण्याची शक्यता अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी व्यक्त केली आहे. 

कुरुंदकर याच्या घरातून नुकतेच जप्त केलेल्या फ्रीजची तपासणी देखील योग्य प्रकारे होईल की नाही? याबाबत देखील त्यांनी शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे कुरुंदकर याच्या घरातुन जप्त केलेल्या 25 वस्तूंची तपासणी इतर राज्यातील फॉरेन्सिक विभागाकडून करण्यात यावी, अशी मागणी राजु गोरे यांनी केली आहे.   

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात अभय कुरुंदकर याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी वर्षभरापुर्वी कुरुंदकर याच्या घरावर छापा मारुन त्याच्या घरातील 25 संशयास्पद वस्तू ताब्यात घेतल्या होत्या. 

या वस्तूंमध्ये महिलाचे केस, कंगवे, उषीच्या घोळी, बेडशीट तसेच कुरुंदकर याने भिंतीवर उडालेले रक्ताचे डाग झाकण्यासाठी तीन महिन्यामध्ये हॉलला दुसऱ्यांदा दिलेल्या रंगाच्या पूडचाही यात समावेश आहे. सदर सर्व वस्तु पोलिसांनी फॉरेन्सीक लॅबला त्यावेळी तपासणीसाठी पाठवून दिल्या होत्या. 

मात्र या वस्तूपैकी एकाही वस्तूचे डीएनए अश्विनी बिंद्रे यांच्या डीएनएशी जुळले नसल्याचे फॉरेन्सिक विभागाने केलेल्या तपासणीत आढळुन आले आहे. तशा प्रकारचा उल्लेख नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणात पनवेल न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रामध्ये केला आहे.

अश्विनी बिद्रे यांची हत्या केल्यानंतर अभय कुरुंदकर याने त्यांच्या मृतदेहाचे तुकडे घरातील फ्रीजमध्ये रक्त गोठविण्यासाठी ठेवल्याची माहिती आरोपी महेश पळणीकर आणि कुंदन भंडारी यांच्या चौकशीतून पुढे आली आहे.

पोलिसांनी या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी कुरुंदकर याच्या घरातील फ्रीज ताब्यात घेऊन फॉरेन्सिक विभागाकडे पाठविला आहे. मात्र फॉरेन्सिक विभागाने यापुर्वी केलेल्या वस्तूंचा अहवाल निराशाजनक असल्यामुळे आता फ्रीजची तपासणी तरी योग्य प्रकारे होईल कि नाही? याबाबत राजु गोरे यांनी शंका उपस्थित केली आहे. 

अभय कुरुंदकर याच्या पाठीमागे राजकिय पाठबळ असल्याने तसेच तो स्वत: पोलीस अधिकारी असल्याने त्याने आपल्या पदाचा पुरेपुर वापर करुन अश्विनी बिद्रे यांचे हत्याप्रकरण दडपण्यासाठी जीवाचे रान केले आहे.

या प्रकरणाचा तपास दुबळा कसा करता येईल याची दखल त्याने पूर्वीच घेतली होती. त्यामुळे त्याने अश्विनी बिद्रे यांची हत्या केल्यानंतर या हत्या प्रकरणाशी संबधीत सर्व पुरावे नष्ट केल्याचे तपासात आढळून आले आहे.

कुरुंदकर याने आपल्या पदाचा व राजकीय पाठबळाचा वापर करुन फॉरेन्सिक लॅबच्या अहवालत फेरफार केला असण्याची शक्यता अश्विनी बिंद्रे यांचे पती राजू गोरे व्यक्त केली आहे. त्यामुळे कुरुंदकर याच्या घरातून जप्त केलेल्या फ्रीजची तपासणी देखील योग्य प्रकारे होईल की नाही? याबाबत देखील त्यांनी शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे पोलिसांनी अभय कुरुंदकर याच्या घरातुन जप्त केलेल्या 25 प्रकारच्या वस्तु व फ्रीज या सगळ्यांची तपासणी इतर राज्यातील फॉरेन्सिक विभागाकडून पुन्हा तपासून घ्यावेत, अशी मागणी राजु गोरे यांनी केली आहे.

अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणाशी संबधीत असलेल्या 25 वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचा फॉरेन्सिक विभागाचा अहवाल निगेटीव्ह आल्यांनंतर त्या वस्तूंची तपासणी इतर फॉरेन्सिक विभागाकडून करण्याची तयारी आता नवी मुंबई पोलिसांनी सुरु केली आहे. तशा प्रकारचे पत्र नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी फॉरेन्सिक विभागाला पाठविले आहे. तसेच सदर वस्तू नष्ट न करता, त्या तशाच ठेवण्यात यावेत असेही त्यांनी फॉरेन्सिक विभागाला कळविले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com