`लटकाना, अटकाना, पटकाना'मुळेच प्रकल्प रखडले : मोदी

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाविषयी गेल्या वीस वर्षांपासून आपण एेकत आहोत. या प्रकल्पाच्या जिवावर खासदार, आमदार निवडून आले. सरकारही स्थापन झाले. परंतु, विमानतळ बनले नाही. `लटकाना, अटकाना, पटकाना' हीच मागच्या सरकारच्या कामाची पद्धत होती. त्यामुळे प्रकल्प फक्त कागदावर राहिले, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबई विमानतळाच्या भूमिपूजन प्रसंगी केली.
`लटकाना, अटकाना, पटकाना'मुळेच प्रकल्प रखडले : मोदी

पुणे : नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाविषयी गेल्या वीस वर्षांपासून आपण एेकत आहोत. या प्रकल्पाच्या जिवावर खासदार, आमदार निवडून आले. सरकारही स्थापन झाले. परंतु, विमानतळ बनले नाही. `लटकाना, अटकाना, पटकाना' हीच मागच्या सरकारच्या कामाची पद्धत होती. त्यामुळे प्रकल्प फक्त कागदावर राहिले, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबई विमानतळाच्या भूमिपूजन प्रसंगी केली. 

मराठीमध्ये भाषणाला सुरवात करीत पंतप्रधांनी 2022 मधील मुंबईचे गुलाबी स्पप्न रंगवत आपल्या भाषणाला पूर्णविराम दिला.

ते म्हणाले, की 2022 मध्ये प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले असेल. हवाई वाहतुकीबरोबरच रस्ते आणि जलमार्गाने वाहतूक जलद होण्यासाठी मूलभूत सुविधा निर्माण झालेल्या असतील. शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे कामही पूर्ण झालेले असेल.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन; तसेच जेएनपीटीच्या चौथ्या बंदराचे उद्घाटनही आज झाले. या वेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू पूसपती, राज्याच्या बंदरे खात्याचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com