औरंगाबादच्या जिल्हाधिकारीपदी सुनील चव्हाण, नवलकिशोर राम यांच्याकडे पुणे

औरंगाबादच्या जिल्हाधिकारीपदी सुनील चव्हाण, नवलकिशोर राम यांच्याकडे पुणे

औरंगाबाद : जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची पुणे जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांची औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ते उद्या पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे.

जिल्हाधिकारी पदावरील एक वर्षापेक्षा जास्त कार्यकाळात  नवलकिशोर राम यांनी जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत उलेखनीय काम केले. यासोबतच शहरात कचरा प्रश्न पेटल्याने तत्कालीन आयुक्त डी.एम. मुगळीकर यांना हटविल्यानंतर त्यांच्याकडे मनपा आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार होता. मागील महिनाभरात यांनी मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळल्या.

पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. राव हे उद्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com