navab malik | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

"धोरणलकव्या'मुळे राज्यात वीजटंचाई : नवाब मलिक

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

मुंबई : राज्यात वीजटंचाई सुरू होण्यामागे सरकारचा "धोरणलकवा' कारणीभूत असून, खासगी ऊर्जा प्रकल्पांच्या लाभासाठी कोळशाची "कृत्रिम टंचाई' सुरू असल्याचा सनसनाटी आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी केला आहे. काही दिवसांपासून राज्यात वीजटंचाईमुळे भारनियमनाचे संकट ओढवले आहे. औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी पुरेशा कोळशाचा पुरवठा होत नसल्याचे कारण दिले जात असले तरी यामागे शिस्तबद्ध पद्धतीने टंचाई निर्माण करण्याचाच प्रयत्न झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

राज्यात जून-जुलैपासून सर्वच औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना कोळशाची टंचाई आहे. "महाजनको'च्या प्रकल्पांना तर मोठी टंचाई भासत असल्याने वीजनिर्मिती कमी झाली आहे. परिणामी भारनियमन करण्याची वेळ सरकारवर आली आहे. यामागे खासगी ऊर्जा प्रकल्पांकडून वाढीव दराने वीज खरेदी करून लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका मलिक यांनी केली आहे. 

याबाबत मलिक यांनी सांगितले की, राज्य सरकारने कोराडी औष्णिक प्रकल्प पूर्णतः बंद करून भंगारात काढला आहे. यामागेही खासगी ऊर्जा कंपन्यांना फायदा मिळवून देण्याचा घाट घातल्याचा संशय असून केंद्र सरकारच्या धोरणाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाने जुन्या प्रकल्पांचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्याचे धोरण ठरवले होते. 

महाराष्ट्रातील असे प्रकल्प नव्याने व उत्तम क्षमतेने सुरू करण्यासाठी करार करण्याची तयारीही महामंडळाने दाखवली होती. मात्र, राज्याच्या ऊर्जा विभागाने याकडे दुर्लक्ष करत कोराडी हा एकमेव औष्णिक प्रकल्प भंगारात काढला. हा एकच प्रकल्प पूर्णतः बंद करण्याचे कारण काय, असा सवालही त्यांनी केला. 

खासगी प्रकल्पांना पुरवठा 
मार्चमध्ये महाराष्ट्राला 40.7 लाख मेट्रिक टन कोळशाची गरज लागते. मात्र, त्या वेळी शेजारच्या राज्यांना महाराष्ट्राने अतिरिक्‍त वीज पुरवल्याने सध्या कोळसाटंचाई जाणवत असल्याची माहिती ऊर्जा विभागाच्या सूत्रांनी दिली. सध्याची वीजनिर्मितीची टंचाई भरून काढण्यासाठी 20 ते 22 रेल्वे रॅकची गरज आहे. मात्र, कोळसा पुरवठा करणारी वेस्टर्न कोल लि. ही कंपनी कराराप्रमाणे खासगी प्रकल्पांना कोळशाचा पुरवठा करत आहे. त्यामुळे सरकारच्या मागणीनुसार तातडीने कोळसा पुरवठा होत नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

संबंधित लेख