national politics | Sarkarnama

भाजपच्या विजयाने दिल्लीतील अराजकतेच्या अंत : शहा

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 मे 2017

दिल्ली महापालिकांतील भाजपचा विजय हा येणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांच्यंदृष्टीने महत्त्वाचा असून, अराजकतेचा अंत असल्याचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे सांगितले. 

नवी दिल्ली : दिल्ली महापालिकांतील भाजपचा विजय हा येणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांच्यंदृष्टीने महत्त्वाचा असून, अराजकतेचा अंत असल्याचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे सांगितले. 

दिल्लीतील तिन्ही महापालिका निवडणुकांत भाजपने "आप' आणि कॉंग्रेसला चारीमुंड्या चीत करीत अभूतपूर्व यश मिळवले. यानिमित्त आयोजिलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शहा बोलत होते. 

भाजपच्या विजयाचे श्रेय तळागाळातील कार्यकर्त्यांना जाते, असेही त्यांनी नमूद केले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या ईव्हीएममधील घोटाळाच्या कथित आरोपाचा शहा यांनी खरपूस समाचार घेत, तो फेटाळला. इतर पक्षांनीही अशाच प्रकारचा केलेला आरोपही निवडणूक आयोगाने बेदखल ठरवला, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ""दिल्लीतील मतदारांना दिलेला कौल हा देशाचा कौल आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशीच देश असल्याचे या निवडणुकीने सिद्ध केले आहे.'' 
 

संबंधित लेख