Nasik Shivsena BJP fight over traders bank | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

व्यापारी बॅकेच्या सत्तेसाठी शिवसेना भाजपात भाऊबंदकी

सरकारनामा
मंगळवार, 23 मे 2017

भाजपाचे पॅनेल लंगडे? 
संतोष मंडलेचा, प्रकाश घुगे या दोन संचालकांनाही सत्ताधारी गटाने गळाला लावले आहे. त्यामूळे गेल्या निवडणूकीत 22 पैकी 16 जागा सत्ताधारी गटाला तर विरचधकांना सहा जागा मिळाल्या होत्या. सहातील चार सदस्य सत्ताधारी गटाच्या संपर्कात असल्याने भाजपाचे पॅनेल लंगडे होण्याची शक्यता दिसू लागली आहे. 

नाशिक: विविध सत्तापदे पादाक्रांत केल्याने वाढलेली राजकीय महत्वाकांक्षा भाजपाला अडसर ठरू लागली आहे. शहरातील महत्वाची सहकारी सत्ता असलेल्या व्यापारी बँक निवडणूकीत नेत्यांतच दुफळी झाली. त्यामूळे शिवसेना भाजपामध्ये भाऊबंदकीचा अंक रंगला आहे. आता पॅनेलसाठी नेते, मंत्र्याकडे वाद पोहोचला आहे.

महापालिकेनंतरची सत्ता म्हणून शहरी राजकारणात नामको व व्यापारी या दोन मोठ्या सहकारी बॅका आहेत. 'नामको' वर प्रशासक असल्याने व्यापारी बँक सर्व पक्षांसाठी राजकारणाचे केंद्र आहे. यामध्ये शिवसेनेचे दत्ता गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निवृत्ती अरिंगळे यांची सत्ता आहे.

त्यांच्या विरोधात भाजपाचे हेमंत गायकवाड, सुनिल आडके आणि अशोक सातभाई यांनी पटेल केले होते. यंदाही तशा हालचाली होत्या. मात्र गायकवाड यांनी ऐनवेळी मनसेतून भाजपात प्रवेश करीत पत्नी नगरसेविका संगीता गायकवाड यांना प्रभाग 21 मधून उमेदवारी मिळवली. त्यात सरचिटणीस आडके यांची उमेदवारी कट झाली.

यातून एव्हढे मतभेद वाढले की आडके सत्ताधारी गायकवाड यांच्या गटाला लागले. सातभाई महापालिका निवडणूकीत पराभूत झाल्याने त्यांनाही रिस्क व दुसरा पराभव परवडणारा नाही. ते सुद्धा हेमंत गायकवाडांपासून फटकून आहेत. त्यामुळे शिवसेनेशी संघर्षाच्या तयारीवर पाणी पडले आहे.

हेमंत गायकवाड आंणि बँकेचे सत्ताधारी नेते दत्ता गायकवाड काका- पुतने आहेत. त्यांना या निवडणुकीत परस्परांची राजकीय भाऊबंदकीचा हिशेब चुकता करायचा आहे. मात्र मैदानात उतरण्याआधीच शहर भाजपा या निवडणूकीत दुभंगला आहे. हेमंत गायकवाड एकटेपडले असून ते भाजप शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांचे निकटवर्तीय आहेत. हे संबधही पडद्यामागे राजकारणात अडसर ठरत आहेत.

तर आमदार सानप पालकमंत्री गिरीष महाजन यांचे विश्र्वासू सहकारी मानले जातात. त्यामूळे महापालिका निवडणूकीचा राजकीय अडसर दूर करण्यासाठी स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांत समझोत्यासाठी हा विषय पालकमंत्र्यांच्या दरबारात जाणार हे स्पष्ट झाले आहे. त्याला किती यश येते यावर महापालिका, नगरपालिका निवडणूकांतील यशानंतर उत्साह वाढलेल्या भाजपाला किती यश येते हा उत्सुकतेचा विषय आहे .

 

 

संबंधित लेख