nasik police & corporator greet ruckdrivers | Sarkarnama

नगरसेवक  पोलिस निरीक्षकांनी गुलाब दिल्याने ट्रक चालकाने जोडले हात! 

संपत देवगिरे :  सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

नाशिक :  पुणे रस्त्यावरील फेम सिग्नलवर आज नगरसेवक राहुल दिवे, पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते व त्यांच्या सहकाऱ्यांनी लाल सिग्नल पडल्यावर ट्रक अडवले.

ट्रक अडवल्यावर चालकांची नेहेमीसारखीच धाकधुक झाली. तो कागदपत्र घेऊन खाली उतरला. मात्र उतरल्यावर त्याला गुलाबाची फुले देत हात जोडुन सिग्नल अन्‌ वाहतुकीचे नियम पाळा असे सांगीतल्याने ट्रक चालकाला धक्काच बसला. निमित्त होते नगरसेवक दिवे यांनी आयोजित केलेला जनजागरण सप्ताह. 

शहरातील बहुतांश सिग्नलवर वाहनचालकांकडून नियमा धाब्यावर बसवले जात असल्याने अनेक अपघात होतात. शहरात सिग्नलवर अपघातांची संख्या मोठी आहे. त्याबाबत जागरुकतेसाठी त्यांनी महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीचा मुहुर्त साधला आहे. "तो बदल स्वतः मध्ये घडवा, जो तुम्ही समाजात पाहू इच्छीता'' असा संदेश गांधीजींनी दिला. तो प्रत्यक्षात आणन्यासाठी युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस, नगरसेवक राहूल दिवे यांनी काल सायंकाळी समर्थकांसह या वाहतुक बेटाची स्वच्छता केली. 

दुभाजकांची स्वच्छका करुन त्याची रंगरंगोटी केली. रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे रंगवले. पावसाने व्यत्यय आणल्याने ते काम अर्धवट राहिले. मात्र आज सकाळी त्यांनी पुन्हा स्वच्छता केली. रस्ता झाडला, सिग्नलची स्वच्छता केली. नागरीकांना फुले देत शुभेच्छा देत वाहतुक नियमांचे पालनाचा आग्रह धरला. कार्यकर्ते फलक हाती घेऊन, चौकात आवाहनाचे फलक लावुन प्रत्येकाने वाहतुक नियमांचे पालन करावे. हिरवा सिग्नल झाल्यावर वाहन पुढे न्यावे असा आग्रह धरत होते. गांधी जयंतीला झालेला हा अभिनव उपक्रम चर्चेचा विषय ठरला. नगरसेविका आशा तडवी, स्वप्नील पाटील, जयेश सोनवणे, प्रसाद नागवंशी, पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते असे विविध पदाधिकारी त्यात सहभागी होतील. 

संबंधित लेख