Nasik Municipal commissioner Tukaram Munde in action , suspends three | Sarkarnama

तुकाराम मुंडे इन ऍक्शन  : घरी बसून खोटी हजेरी नोंदविणारे तिघे निलंबित   ! 

संपत देवगिरे :  सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 13 मार्च 2018

आरोग्य विभागातील मुकादमाने सफाई कर्मचारी कामावर नसतांना त्यांची हजेरी नोंदविली. हे लक्षात येताच या तिघांना निलंबीत करण्यात आले. अन्य तिघांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याच्या सुचना दिल्या. 

नाशिक :  महापालिका प्रशासनाला गती देण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विविध स्तरावर प्रयत्न सुरु केले आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांत वक्तशीरपणा व जबाबदारीने काम करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. मात्र आरोग्य विभागातील मुकादमाने सफाई कर्मचारी कामावर नसतांना त्यांची हजेरी नोंदविली. हे लक्षात येताच या तिघांना निलंबीत करण्यात आले. अन्य तिघांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याच्या सुचना दिल्या. 

नाशिक महानगरपालिकेच्या घरपट्टी वसुली कामकाजात कर्तव्य कसुर केल्याने नाशिकरोड विभागीय कार्यालयातील एक वरिष्ठ लिपीक, सातपुर विभागीय कार्यालयातील एका कनिष्ठ लिपीकासह आरोग्य विभागातील 3 कर्मचा-यांना निलंबित केले आहे. घरपट्टी वसुलीमध्ये कर्तव्य कसुर केल्याचे उपायुक्तांच्या निर्दशनास आणल्याने वरिष्ठ लिपिक विनायक मोहन साळवे, सातपुरचे कनिष्ठ लिपीक सागर रघुनाथ साळवी यांना निलंबित केले. स्वच्छता निरिक्षक एकनाथ ताठे व मुकादम युवराज जाधव यांनी सफाई कर्मचारी कामावर नसतांना त्यांची हजेरी नोंदविली. श्रीमती वैशाली ताठे सफाई कामावर हजर नव्हत्या. त्यामुळे या तिघांना निलंबित केले. 

वादग्रस्त अधिकारी धास्तावले 
महापालिकेत अनेक वर्षांपासून बारा अधिकाऱ्यांची चौकशी प्रलंबित होती. आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी महिनाभरात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अभ्यासाअंती यांत्रिकी विभागाचे निवृत्त अधीक्षक अभियंता रमेश पवार, अग्निशमन दलाचे प्रमुख अनिल महाजन, उद्यान अधीक्षक गो. बा. पाटील, मायको दवाखान्याचे निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. हिरामण कोकणी यांची चौकशी पूर्ण होऊन दोषारोप सिद्ध झाले आहेत. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे त्यावर कारवाई होत नव्हती. आयुक्तांनी त्यात लक्ष घातल्याने वादग्रस्त काम करणारे अधिकारी धास्तावले आहेत.  

संबंधित लेख