nashikshivsena and rammandir | Sarkarnama

शरयुतीरावरील आरतीची जबाबदारी नाशिकच्या शिवसैनिकावर

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 नोव्हेंबर 2018

नाशिक : शिवसेना कार्यकर्त्यांना घेऊन अयोध्येला रवाना झालेली विशेष रेल्वे सकाळी आठला पोहोचली. विशेष कोड असलेल्या वेषात त्यांनी शरयु व परिसरात घोषणा देत भ्रमण केले. आज सायंकाळी होणारी शरयु नदीच्या आरतीची जबाबदारी नाशिकच्या नेत्यांवर आहे. त्यामुळे ही आरती जोषात व्हावी यासाठी सगळ्यांनी उत्साहाने तयारी केली आहे. त्यामुळे अयोध्येत आज होणाऱ्या आरतीत मराठी बाणा अवतरणार अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली. 

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर नाशिक आणि ठाणे येथुन कार्यकर्त्यांना घेऊन जाणारी विशेष रेल्वे आज सकाळी फैजाबाद रेल्वे स्थानकावर पोहोचली. त्यानंतर या शिवसैनिकांना खास ड्रेस कोड देण्यात आला आहे. तोच गणवेष घालुन सगळ्यांनी सायंकाळच्या शरयु तीरावरील आरतीत सहभागी होणार आहेत. खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वे गाडीची व्यवस्था केली होती. जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, नगरसेवक विलास शिंदे, दत्ता गायकवाड, नगरसेवक सुधाकर बडगुजर, सुनिल जाधव यांसह विविध पदाधिकारी होते. नाशिक येथील 1350 कार्यकर्ते गेले आहेत. ठाणे व पुणे येथील कार्यकर्तेही आहेत. त्यांचे संयोजन नाशिकचे पदाधिकारी करीत आहे. सकाळी खासदार संजय राऊत यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना सुचना केल्या. दुपारी उध्दव ठाकरे येथे पोहोचले. त्यानंतर सायंकाळी ते शरयु नदीच्या तीरावर आरती करतील. त्यात मराठी घोषणांसह नाशिकचे शिवसेना कार्यकर्ते नदीत बोटीतही असतील. त्यामुळे ही आरती स्थानिक नागरिकांसाठीही उत्सुकतेचा विषय बनली आहे. 

संबंधित लेख