Nashik's Laxman Mandale's Fake Facebook Account | Sarkarnama

'राष्ट्रवादी'चे संभाव्य उमेदवार मंडालेंच्या बनावट फेसबुक अकाऊंटने राजकीय धावपळ 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

मंडाले यांचे फेसबुक अकाऊंट त्यांचे चिरंजीव हाताळतात. गेल्या महिन्यात त्यांना अगदी हुबेहुब वाटेल असे एक नवे फेसबुक खाते आढळले. पाहता पाहता त्याला पाचशेहून अधिक कार्यकर्त फॉलोअर्स जोडले गेले. त्यावर विविध पोस्टही टाकल्या जात होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य आणि महाराष्ट्र राज्य स्टेट को ऑपरेटिव्ह फायनान्सचे माजी अध्यक्ष असलेल्या लक्ष्मण मंडाले यांनी याविषयी सायबर सेलकडे तक्रार केली.

नाशिक : सध्याच्या निवडणुकांत सोशल मिडीयावर सगळ्यांचाच भर असतो. हा कल अगदी विधानसभा मतदारसंघांपर्यंत झिरपला आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवारांना खिंडीत गाठण्यासाठी चक्क बनावट खाती उघडली जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे देवळाली मतदारसंघातील संभाव्य उमेदवार लक्ष्मण मंडाले यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते उघडल्याचा प्रकार घडला. त्यामुळे पक्षानेही त्याची गंभीर दखल घेतल्याने प्रशासन व नेत्यांची चांगलीच धावपळ झाली. 

मंडाले यांचे फेसबुक अकाऊंट त्यांचे चिरंजीव हाताळतात. गेल्या महिन्यात त्यांना अगदी हुबेहुब वाटेल असे एक नवे फेसबुक खाते आढळले. पाहता पाहता त्याला पाचशेहून अधिक कार्यकर्त फॉलोअर्स जोडले गेले. त्यावर विविध पोस्टही टाकल्या जात होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य आणि महाराष्ट्र राज्य स्टेट को ऑपरेटिव्ह फायनान्सचे माजी अध्यक्ष असलेल्या लक्ष्मण मंडाले यांनी याविषयी सायबर सेलकडे तक्रार केली. यातुन राजकीय चारित्र्यहनन करण्याचा डाव असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता. 

सायबर सेलने त्याची दखल घेऊन ते खाते बंद केले. त्याचा तपास केल्यावर गिरणारे परिसरातील काही राजकीय कार्यकर्ते हे खाते चालवत असल्याचे आढळले. या प्रकाराने सोशल मिडीया सेल अधिक जागरुक होऊन काम करु लागला आहे. 

संबंधित लेख