Nashik ZP Officer Appologies | Sarkarnama

महिला सभापतींना दिलेल्या वागणुकीबद्दल नाशिक जिल्हा परिषद अधिकाऱ्याने मागितली माफी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्षा नयना गावित यांनी महिला व बालकल्याण समिती सभापती अपर्णा खोसकर यांना दिलेल्या वागणुकीबद्दल  मुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. पोषण आहार योजनेत राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल मुंबईतील पुरस्काराची माहिती उशिरा देत सभापतींना अपमानास्पद वागणूक दिली. त्याचा जाब विचारला.

नाशिक : जिल्हा परिषदेतील महिला सभापतींना अधिकाऱ्यांनी अपमानास्पद वागणुक दिल्याच्या विरोधात महिला सदस्यांनी सोमवारी सभागृहात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर वरिष्ठांनी हस्तक्षेप केल्यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. मुंडे यांनी माफी मागितल्यावर वाद संपला. 

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्षा नयना गावित यांनी महिला व बालकल्याण समिती सभापती अपर्णा खोसकर यांना दिलेल्या वागणुकीबद्दल  मुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. पोषण आहार योजनेत राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल मुंबईतील पुरस्काराची माहिती उशिरा देत सभापतींना अपमानास्पद वागणूक दिली. त्याचा जाब विचारला.

त्यानंतर सर्वच संतप्त महिला सदस्यांनी तक्रारींचा पाढा सुरू केला. त्यानंतर महिला सदस्यांनी अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी व्यासपीठावरून खाली येत ठिय्या आंदोलनातुन आपला राग व्यक्त केला. अन्य सदस्यांनीही उभे राहून पाठिंबा दर्शविला. अध्यक्षा शीतल सांगळे यांनी अधिकाऱ्याची चूक झाली आहे, कारवाई होईल, असे यावेळी सांगीतले. मुंडे आडनाव राज्यात प्रसिद्ध आहे, त्याचातरी विचार करा असे राष्ट्रवादीच्या भारती पवार यांनी सुनावले. 

त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. मुंडे यांनी सभागृहात सर्वांसमोर चूक झाल्याचे मान्य करत यापुढे असा प्रकार घडणार नाही असे सांगितल्यानंतर महिलांचा राग कमी झाला. उपाध्यक्षा नयना गावित, सभापती सुनीता चारोस्कर, मनीषा पवार, अपर्णा खोसकर आदींनी त्यात पुढाकार घेतला. 

कारकिर्दीत पहिलाच प्रसंग - डाॅ. गिते
माझ्या अधिकाऱ्याकडून सभापतींनाच अशी वागणूक मिळाली याचे मला फार वाईट वाटते. आजपर्यंतच्या संपूर्ण कारकिर्दीत पहिल्यांदाच अशी वेळ माझ्यावर आली आहे - डॉ. नरेश गिते, मुख्य कार्यकारी अधिकारी 

संबंधित लेख