Nashik ZP CEO Naresh Gite Fired Gramsevaks | Sarkarnama

सीईओ गितेंनी ग्रामसेवकाचे कान टोचले; म्हणाले दिवसभर पाणी न पिता राहून दाखवा 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर नांदगाव पंचायत समितीमध्ये पाणी टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सभापती मनिषा पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार यांसह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी डॉ. गिते यांनी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंच्या आराखड्यात तालुक्‍यातील प्रस्तावित असलेल्या 16 योजना पाच योजनांचे अपूर्ण असलेले सर्वेक्षण तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले. 

नाशिक : तीव्र दुष्काळ असलेल्या नांदगाव परिसराला जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. नरेश गिते यांनी भेट दिली. आढावा बैठक घेतली. यावेळी प्रशासनाच्या कामला गती देण्यासाठी त्यांनी ग्रामसेवकांना फैलावर घेतले. "एव्हढा दुष्काळ आहे तरी तुम्ही निष्काळजी कसे. चोवीस तास पाणी पिता राहून दाखवाल का? गावात विहीर असतांना टँकर कसा येतो? विहीरीला पाणी असताना टॅंकर आला तर पैसे वसुल करु'' या शब्दांत त्यांनी ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांचे कान टोचले. 

दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर नांदगाव पंचायत समितीमध्ये पाणी टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सभापती मनिषा पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार यांसह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी डॉ. गिते यांनी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंच्या आराखड्यात तालुक्‍यातील प्रस्तावित असलेल्या 16 योजना पाच योजनांचे अपूर्ण असलेले सर्वेक्षण तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले. 

याप्रसंगी उपस्थित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी टॅंकरच्या संदर्भात समस्यांचा पाढा वाचत सुरू असलेले टॅंकर नादुरुस्त असल्याची तक्रार केली. यावर तातडीने डॉ. गिते यांनी कारवाई करत तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ टॅंकर बदलून देण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले. गावात टॅंकर सुरू असताना विंधन विहिरीसाठी ग्रामसेवकांनी प्रस्ताव दिलेले नसल्याने नाराजी व्यक्त केली. गावात विंधन विहिरींना पाणी असल्यास टॅंकरचा खर्च वसुल करण्याचा इशारा दिला. त्यामुळे बैठक दुष्काळाची मात्र चर्चा प्रशासनाच्या खरडपट्टीची अशी स्थिती होती. 

बैठकीस पंचायत समिती सभापती विद्याताई पाटील, जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे, पंचायत समिती सदस्य सुभाष कुठे, मधुबाला खिराडकर, तहसीलदार भारती सागरे, कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर, गट विकास अधिकारी जगन सूर्यवंशी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते. 

संबंधित लेख