नाशिकचे भाजप नगरसेवक दोंदेंनी केली मध्यरात्रीची पंचतारांकीत पाणीचोरी उघड

महापालिकेच्या जलपुर्नभरण केंद्रात अवैध साठा करुन त्याची पंचतारांकीत हाॅटेल्सना होणारी विक्री उघडकीस आली आहे. भाजपचे नगरसेवक राकेश दोंदे मध्यरात्री घरी परतत असतांना त्यांना संशयास्पद टॅंकर दिसला. त्याची तपासणी करीत त्यांनी ही पाणीचोरी उघडकीस आणली. यानिमित्ताने महापालिका प्रशासन व टँकर्सचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
नाशिकचे भाजप नगरसेवक दोंदेंनी केली मध्यरात्रीची पंचतारांकीत पाणीचोरी उघड

नाशिक : महापालिकेच्या जलपुर्नभरण केंद्रात अवैध साठा करुन त्याची पंचतारांकीत हाॅटेल्सना होणारी विक्री उघडकीस आली आहे. भाजपचे नगरसेवक राकेश दोंदे मध्यरात्री घरी परतत असतांना त्यांना संशयास्पद टॅंकर दिसला. त्याची तपासणी करीत त्यांनी ही पाणीचोरी उघडकीस आणली. यानिमित्ताने महापालिका प्रशासन व टँकर्सचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

अंबड रस्त्यावर एका पंचतारांकीत हाॅटेलमागे अंबडला महापालिकेचे जल पुनर्भरण केंद्र आहे. मंगळवारी ( ता.16) मध्यरात्री दोन वाजता दोंदे पाहुण्यांना रेल्वेस्थानकावर सोडुन घरी परतत होते. यावेळी दोंदे यांना टॅंकरमध्ये पाणी भरले जात असल्याचे आढळले. मध्यरात्रीनंतर दोन वाजता होत असलेली ही पाणीचोरी पाहून दोंदे यांनी आपले वाहन थांबवून संबंधित टँकर चालकाकडे याबाबत विचारणा केली. यावेळी मद्यधुंद स्थितीतील चालकाने आम्ही मध्यरात्री टँकरमध्ये पाणी भरून सकाळी  वेगवेगळ्या हॉटेलमध्ये टँकर रिकामा करतो असे सांगितले.

याठिकाणी कोणीही जबाबदार कर्मचारी नव्हता. दोंदे यांनी महापालिका अधिका-यांशी संपर्क केला. मात्र, काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी अन्य अधिका-यांना सर्व माहिती कळवली. आता याबाबत महापालिका व्हाॅल्वमन तसेच अन्य अधिकारी व त्यांची भूमिका तसेच टँकरचालकांची चोरी यावर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.

अद्याप उन्हाळयाचा कडाका सुरु झालेला नसतांना महानगर परिसरला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धारणातील पाणीसाठ्याचे नियोजन करून, पाणी बचतीचे नियोजन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मनपाच्याच जलपुनर्भरण केंद्रावरून पाण्याची मध्यरात्री चोरी करून त्याची तारांकित हॉटेल्सना चढ्या भावात खुलेआम विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. महापालिका प्रशासन याबाबत काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. मुंबई, ठाणे शहरांप्रमाणेच नाशिकमध्येही पाणीचोरीचे रॅकेट यानिमित्ताने चर्चेत आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com