Nashik Veer Procession | Sarkarnama

वीरांच्या मिरवणुकीत आमदार तांबेंनी धरला ठेका

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 मे 2017

वडाळा - वाडली ता. चाळीसगाव येथे झालेल्या भव्य पारंपारिक वीर मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये आमदार डॉ. तांबे यांचा सहभाग हा कौतुकाचा विषय ठरला. यावेळी समवेत अनेक पदाधिकारी, जुने कलावंत, कार्यकर्ते उपस्थित होते. या मिरवणुकीचे  वैशिष्ट म्हणजे प्राचीन काळापासून सत्याच्या विजया निमित्त दरवर्षी या वीर महोत्सवाचे आयोजन होते.

चाळीसगाव - महाराष्ट्र हा विविध परंपरा रुढी अशा विविधतेने नटलेला आहे. उत्तर महाराष्ट्रातील श्रध्देचे ठिकाणे. वडाळा (चाळीसगाव) येथील पारंपारीक वीर मिरवणुकीत आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीही भाग घेत ठेका धरल्याने ग्रामस्थांच्या आनंदात भर पडली.

वडाळा - वाडली ता. चाळीसगाव येथे झालेल्या भव्य पारंपारिक वीर मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये आमदार डॉ. तांबे यांचा सहभाग हा कौतुकाचा विषय ठरला. यावेळी समवेत अनेक पदाधिकारी, जुने कलावंत, कार्यकर्ते उपस्थित होते. या मिरवणुकीचे  वैशिष्ट म्हणजे प्राचीन काळापासून सत्याच्या विजया निमित्त दरवर्षी या वीर महोत्सवाचे आयोजन होते. पारंपरिक वेशभूषा, वाद्य, पारंपारीक शंखाचे पूजन, खेळ, नृत्याचा ठेका यामुळे ही वीर यात्रा राज्यात प्रसिध्द आहे.

विशेषत: उत्तर महाराष्ट्रात ही यात्रा खूप लोकप्रिय आहे. या वीर मिरवणूक सहभागानंतर आ. डॉ. तांबे म्हणाले ''महाराष्ट्र हा जसा सह्याद्री, वैनगंगा, पैनगंगा, सातपुडा, गड, किल्ले, नद्या अशा विविधतेने नटला आहे, तशा अनेक बोलीभाषा ही आहेत. प्रत्येकाची काही प्राचिन परंपरा आहे. त्या परंपरा जपल्या जात आहेत. त्यातून आपल्या भागाची वैशिष्टे जपली जात आहेत. या परंपरा मधून सर्वसमाज एकत्र येत असून प्रत्येकाच्या जीवनात आनंद निर्माण होत आहे. एक समृध्द परंपरा लाभलेले राय असलेल्या महाराष्ट्राची विविधता ही देशासाठी कायम दिशादर्शक ठरली आहे.

संबंधित लेख