Nashik Transport Committee May Be Formed Tomorrow | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर नाशिकच्या परिवहन समिती स्थापनेचा मार्ग मोकळा?

संपत देवगिरे 
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

आज दुपारी शहराध्यक्ष आमदार सानप आणि महापौर रंजना भानसी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट सिटी आणि शहराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून सर्व साह्य केले जाईल नियमानुसार परिवहन सेवेसाठी समितीची तरतुद असल्यास समिती स्थापन करावी. त्याविषयी सदस्यांनी एकत्रीत चर्चा करुन निर्णय घ्यावा, असे सांगितल्याचे या नेत्यांनी सांगितले.

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहर बससेवेसाठी नगरसेवकांच्या समितीस नकार दिला होता. यावर तोडगा काढण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावर नाशिक स्मार्ट सिटी करण्यासाठी राज्य शासन सर्व मदत करेन, जे नियमात असेल त्याप्रमाणे योग्य निर्णय घ्या असे आदेश दिले. त्यामुळे उद्या (ता.19) सकाळी नगरसेवकांच्या बैठकीत परिवहन समिती स्थापन करण्याचा निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 

आज दुपारी शहराध्यक्ष आमदार सानप आणि महापौर रंजना भानसी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट सिटी आणि शहराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून सर्व साह्य केले जाईल नियमानुसार परिवहन सेवेसाठी समितीची तरतुद असल्यास समिती स्थापन करावी. त्याविषयी सदस्यांनी एकत्रीत चर्चा करुन निर्णय घ्यावा, असे सांगितल्याचे या नेत्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनंतर आयुक्त मुंढे आणि नगरसेवकांतील वादावर तोडगा निघण्याची शक्‍यता आहे. याबाबत उद्या (ता.19) सकाळी दहाला महापौर निवासस्थानी भाजप सदस्यांची बैठक होणार आहे. त्यात निर्णय घेऊ असे आमदार सानप यांनी सांगितले. 

शहरात परिवहन सेवा सुरु करण्यासाठी येत्या महासभेत प्रशासनाकडून प्रस्ताव समाविष्ट केला आहे. त्यावरुन भाजपच्या सदस्यांत मोठ्या प्रमाणात मतभेद आहेत. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याविषयी परिवहन समिती नियुक्तीस स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे महापौर रंजना भानसी, सभागृहनेते दिनकर पाटील, गटनेते संभाजी मोरुस्कर, उपमहापौर प्रथमेश गिते, शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांसह विविध पदाधिकारी पालकमंत्री गिरीश महाजन यांना भेटले. त्यानंतर पालकमंत्र्यांच्या सुचनेनुसार महापौर आणि शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. 

हे देखिल वाचा - 

जिथे जिथे नगरसेवकांची समिती, तिथे तिथे बससेवा तोट्यात : तुकाराम मुंढे

संबंधित लेख