नाशिक शिक्षक मतदारसंघातील गैरप्रकारांबाबत  निवडणूक आयुक्तांकडे तक्रार

विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत खुलेआम पैशांचा वापर सुरू आहे. प्रत्येक मताला दोन ते पाच हजार रुपये पाकिटातून दिले जात आहेत. काही उमेदवारांनी साडी, पैठणीचेही वाटप केल्याची चर्चा सोशल मीडियातून सुरू आहे. त्याच्या निषेधार्थ काही ठिकाणी शिक्षकांनी पैठणी जाळल्याचेही समजते, अशी तक्रार शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघातील गैरप्रकारांबाबत  निवडणूक आयुक्तांकडे तक्रार

राजूर : विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत खुलेआम पैशांचा वापर सुरू आहे. प्रत्येक मताला दोन ते पाच हजार रुपये पाकिटातून दिले जात आहेत. काही उमेदवारांनी साडी, पैठणीचेही वाटप केल्याची चर्चा सोशल मीडियातून सुरू आहे. त्याच्या निषेधार्थ काही ठिकाणी शिक्षकांनी पैठणी जाळल्याचेही समजते, अशी तक्रार शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.

तक्रारीत कुलकर्णी यांनी म्हटले आहे, की विधानपरिषदेच्या निवडणुकीत हे प्रकार उघड-उघड सुरू असताना निवडणूक आयोगाची यंत्रणा काय करते, असा प्रश्न सामान्य शिक्षकाला पडला आहे. या निवडणुकीचे गांभीर्य आणि पावित्र्य टिकविण्यासाठी तातडीने जिल्ह्यातील गैरप्रकारांचा आढावा घ्यावा. अशा प्रकारे पैसे, साहित्य वाटप करणारे दलाल व उमेदवारांवर कारवाई करावी. हे गैरप्रकार जळगाव, धुळे, नाशिक व नगरमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसते. हा भाग साने गुरुजींचे कार्यक्षेत्र होते. तेथे अशा प्रकारची तक्रार करावी लागते व काही शिक्षक या भेटी स्वीकारून आमिषाला बळी पडतात, ही शिक्षण क्षेत्रासाठी लाजीरवाणी बाब आहे.

काही ठिकाणी आज व उद्या (रविवारी) जेवणावळीही आयोजित केल्याचे समजले आहे. त्यावर निवडणूक यंत्रणेने लक्ष द्यावे. शिक्षण क्षेत्रातील नैतिकता आणखी अधोगतीला नेणारे हे प्रकार थांबवावेत. शिक्षकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी देणारी ही निवडणूक आज शिक्षक नसलेली व्यक्ती आणि राजकीय पक्षांसाठी खुली झाली आहे. याबाबत निवडणुकीनंतर शिक्षक संघटनांसोबत चर्चा करून काही धोरणात्मक बदल करावेत. या निवडणुकीत आर्थिक गैरप्रकार न थांबविल्यास उद्विग्न होऊन अनेक शिक्षक यापुढे मतदार नोंदणीच करणार नाहीत, असे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे.  
राजकारणाच्या बित्तंबातम्यांसाठी डाऊनलोड करा sarkarnama अॅप 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com