nashik smart city | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

राज ठाकरेंनी बांधलेल्या इमल्यांवर उभी राहतेय "भाजप'ची स्मार्ट सिटी 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

नाशिक ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिक शहराला स्मार्ट करण्याचे स्वप्न पाहिले. रतन टाटांपासून तर महिंद्रा उद्योग समुहांपर्यंत अनेकांनी त्यात योगदान दिले. सुंदर प्रकल्प प्रत्यक्षात आले. मात्र आता सत्तेत असलेल्या भाजपने त्याचे बारसे "स्मार्ट सिटी' असे केले. त्यामुळे भाजपने आयत्या बिळावर नागोबा होऊ नये या टीकेने स्मार्ट सिटी होण्याआधीच राजकीय श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. 

नाशिक ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिक शहराला स्मार्ट करण्याचे स्वप्न पाहिले. रतन टाटांपासून तर महिंद्रा उद्योग समुहांपर्यंत अनेकांनी त्यात योगदान दिले. सुंदर प्रकल्प प्रत्यक्षात आले. मात्र आता सत्तेत असलेल्या भाजपने त्याचे बारसे "स्मार्ट सिटी' असे केले. त्यामुळे भाजपने आयत्या बिळावर नागोबा होऊ नये या टीकेने स्मार्ट सिटी होण्याआधीच राजकीय श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. 

महापालिकेने नुकतीच स्मार्ट सिटी योजनेतनऊ प्रकल्प पुर्ण झाल्याचा दावा केला आहे. यामध्ये होळकर पुलाखालील फाऊंटन वॉल (95 लाख), घनकचरा व्यवस्थापन (1.25 कोटी), सरकारवाडा पुनर्निर्माण (9.59 कोटी), पाणी परिक्षण (2.96 कोटी), इतिहास संग्रहालय (2 कोटी) हे प्रकल्प केंद्र शासनाने स्मार्ट सिटी प्रकल्पाची घोषणा होण्यापूर्वीच पुर्ण झाले आहे. 

हे प्रकल्प महापालिकेत "मनसे' सत्तेत असतांना झाली. राज ठाकरे यांच्या प्रयत्नातुन महिंद्रा उद्योग समुहाच्या साह्याने चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कची उभारणी झाली. महामार्ग उड्डाणपुलाखालील सौंदर्यीकरणाचे काम एल. अँड टी. कंपनीच्या सीएसआर फंडातुन दोन वर्षापूर्वीच पूर्ण करण्यात आले. तेव्हा स्मार्ट सिटी नावाची संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. मात्र महापालिकेने आता या सगळ्या प्रकल्पांचा स्मार्ट सिटी असा उल्लेख केला. त्यावर खर्च झालेला निधीही जाहीर केला आहे. 

ज्यासाठी महापालिकेने स्वतःचा पैसाही खर्च केला नाही. ते प्रकल्प महापालिकेच्या घोषणेत कसे यावरुन नवा वाद सुरु झाला आहे. नुकतेच महाकवी कालीदास नाट्यगृहाचे लोकार्पण पालकमंत्री गिरीषमहाजन यांच्या हस्ते झाले. त्यावेळी "मनसे'च्या कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावर गुलाबाची फुले वाटुन त्याचा प्रतिकात्मक निषेध केला होता. आता त्यावरुन राजकीय श्रेयवादाची नवी लढाई सुरु होण्याची चिन्हे आहेत. 

"मनसे सत्तेत असतांना राज ठाकरे यांनी शहरात अनेक प्रकल्प आणले. विविध उद्योगांनी "सीएसआर' फंडातुन सुंदर प्रकल्प उभारलेत. सत्ताधारी भाजप त्या प्रकल्पांना स्मार्ट सिटी नामकरण करीत आहे. त्याचे स्पष्टीकरण शहरवासीयांना दिले पाहिजे.' 
सलीम शेख, गटनेते, मनसे. 

संबंधित लेख