सिमांतीनी कोकाटे करणार कुपोषणाचे 'जीपीएस' द्वारे वास्तव चित्रण! 

सिमांतीनी कोकाटे करणार कुपोषणाचे 'जीपीएस' द्वारे वास्तव चित्रण! 

जिल्ह्यात कुपोषणाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यामध्ये दुष्काळी सिन्नरमध्ये सरकारी यंत्रणा त्यावर गंभीर नाही. त्यामुळे पावसाळ्यात त्यावर नियंत्रण व सुधारणेसाठी भाजपच्या जिल्हा परिषदेच्या युवा सदस्या सिमांतीनी कोकाटे आपल्या शिवसरस्वती संस्थेच्या स्वयंसेवकांमार्फत थेट 'जीपीएस' द्वारे वास्तव चित्रण करणार आहेत. हे स्वयंसेवक कुपोषण निर्मूलनासाठी काम करणार असल्याने प्रशासनही सावध झाले आहे.

नाशिक : जिल्ह्यात कुपोषणाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यामध्ये दुष्काळी सिन्नरमध्ये सरकारी यंत्रणा त्यावर गंभीर नाही. त्यामुळे पावसाळ्यात त्यावर नियंत्रण व सुधारणेसाठी भाजपच्या जिल्हा परिषदेच्या युवा सदस्या सिमांतीनी कोकाटे आपल्या शिवसरस्वती संस्थेच्या स्वयंसेवकांमार्फत थेट 'जीपीएस' द्वारे वास्तव चित्रण करणार आहेत. हे स्वयंसेवक कुपोषण निर्मूलनासाठी काम करणार असल्याने प्रशासनही सावध झाले आहे. 

दुष्काळी तालुका अशी ख्याती असलेले सिन्नर कुपोषणमुक्त करण्यासाठी कोकाटे यांची शिवसरस्वती फाऊंडेशन ही संस्था कटीबद्ध आहे. यामध्ये तालुक्‍यात काम करतांना महिला बालकल्याण विभागाला कामकाजातील त्रुटी निदर्शनास आणून देऊन त्यावर तोडगा काढला जाईल. संस्थेने त्यासाठी स्वयंसेवकांच्या नेमणूका केल्या आहेत. त्यांनी पहिल्या टप्प्यात केलेल्या पाहणीत बहुतांश आंगणवाडी सेविका हलगर्जीपणा करतात असे आढळले.

अंगणवाडीची वेळ सकाळी आठ ते दुपारी एक अशी आहे. मात्र, त्या वेळेत उघडल्या जात नाहीत. विचारणा केल्यावर पदे रिक्त असल्याची कारणे सांगितली जातात. अशा लंगड्या सबबींद्वारे कुपोषणाची स्थिती मात्र बिकट झाली आहे. त्यामुळे यापुढे सर्व स्तरावर लक्ष ठेवले जाईल. 

स्वयंसेवक अंगणवाडीचे स्मार्टफोनच्या 'जीपीएस'शी संलग्न कॅमेऱ्याद्वार चित्रण करतील. त्यात वेळ, ठिकाण, अक्षांश, रेखांशासह नकाशा असेल. त्याची माहिती प्रशासनापुढे ठेऊन जाब विचारला जाईल. हे स्वयंसेवक पोषण आहार, नाश्‍ता, हजेरी पटावरील नोंदी, आहाराची गुणवत्ता, केंद्रावर न येणाऱ्या बालकांच्या पालकांचे समुपदेशन, किशोरवयीन मुली, गर्भवतींचा आहार या सगळ्यांवर बारीक लक्ष ठेवतील.

गैरकारभार, त्रुटी आढळल्यास पुराव्यानिशी संस्थेकडे नोंद करणे ही कामे करतील. हे पुरावे कुपोषण निर्मुलन समितीपुढे ठेवले जातील. त्यातुन दोषींवर कारवाईसाठी पाठपुरावा होईल. त्यामुळे युवा सदस्या म्हणुन कोकाटे यांचा हा पुढाकार चर्चेचा व प्रशासनावर वचक निर्माण करण्यासाठी चांगला प्रयत्न ठरणार आहे. तो किती यशस्वी होतो याकडे सध्या त्यांचे राजकीय विरोधक आणि लोकांचे लक्ष आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com