Nashik Shivsena Sharayu Water | Sarkarnama

शिवसेना नेते म्हणतात, 'आम्ही घडवला गोदावरी- शरयू नद्यांचा संगम' 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

शिवसेना नेत्यांनी आज अयोध्येतून आणलेल्या शरयू नदीच्या जलकुंभाने येथील काळाराम मंदिरात श्रीरामाला अभिषेक केला. यावेळी अयोध्येत लवकर श्रीराम मंदीर उभारण्याचे साकडे घालण्यात आले. यानिमित्ताने गोदावरी व शरयूचा संगम घडविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. 

नाशिक : शिवसेना नेत्यांनी आज अयोध्येतून आणलेल्या शरयू नदीच्या जलकुंभाने येथील काळाराम मंदिरात श्रीरामाला अभिषेक केला. यावेळी अयोध्येत लवकर श्रीराम मंदीर उभारण्याचे साकडे घालण्यात आले. यानिमित्ताने गोदावरी व शरयूचा संगम घडविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. 

आज सकाळी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांसह विविध नेते तसेच मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शरयूच्या पाण्याने अभिषेक केल्यावर आरती करण्यात आली. शिवसेना नेते नाशिकहून गोदावरीचा जलकुंभ घेऊन विशेष रेल्वेने अयोध्येला गेले होते. शरयू नदीच्या काठी आरतीचे संयोजन त्यांनी गेले होते. तेथे हा जलकुंभ शरयू नदीत अर्पण करण्यात आला. आज शरयू नदीचा जलकुंभ घेऊन त्यांनी काळाराम मंदिरात अभिषेक केला. 

यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात 'पहले मंदिर, फिर सरकार' अशा घोषणा देण्यात आल्या. नगरसेवक सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, माजी महापौर विनायक पांडे, सत्यभामा गाडेकर, महानगरप्रमुख महेश बडवे, सचिन मराठे, जिल्हाप्रमुख सुनिल पाटील यांसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

संबंधित लेख