Nashik Shivsena Leder To Join Ncp | Sarkarnama

समीर भुजबळांच्या मिशन लोकसभेत शैलेश ढगेंचा शिवसेनेला जयमहाराष्ट्र! 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 2 जानेवारी 2019

शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा माजी उपजिल्हाप्रमुख शैलेश ढगे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेनेतील पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून ते राष्ट्रवादीसोबत नवी चूल मांडणार आहेत. येत्या पंधरा दिवसांत प्रवेश सोहळा होईल. ढगे आणि त्यांचे समर्थक शविसेनेतील अंतर्गत राजकारणात एकाकी पडल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

नाशिक : लोकसभेचे वारे वाहु लागल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने लोकसंपर्क सुरु केला आहे. माजी खासदार समीर भुजबळांच्या 'मिशन लोकसभा' मध्ये माजी नगरसेवक शैलेश ढगे यांनी प्रतिसाद देत शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करण्याचे संकेत दिले. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. 

शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा माजी उपजिल्हाप्रमुख शैलेश ढगे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शिवसेनेतील पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून ते राष्ट्रवादीसोबत नवी चूल मांडणार आहेत. येत्या पंधरा दिवसांत प्रवेश सोहळा होईल. ढगे आणि त्यांचे समर्थक शविसेनेतील अंतर्गत राजकारणात एकाकी पडल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या दुर्गा माता देवस्थान ट्रस्टतर्फे झालेल्या ज्येष्ठ नागरिक गुणगौरव सोहळ्याला माजी खासदार समीर भुजबळ यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे निवृत्ती अरिंगळे, नाशिक रोड अध्यक्ष मनोहर कोरडे उपस्थित होते. त्यामुळे ढगे शिवसेना सोडणार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. याबाबत ढगे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी प्रवेशाला दुजोरा दिला. 
 

पक्षसंघटनेतील महत्त्वाचे निर्णय, बैठकांना निमंत्रण नाही, मोर्चा, आंदोलनात, कार्यक्रमांना जाणीवपूर्वक दूर ठेवले जाते. महापालिका निवडणूक पराभवानंतर पक्षाने दूर सारले. अडगळीत पडल्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेणे भाग पडले. 
- शैलेश ढगे, माजी नगरसेवक 

संबंधित लेख