पालघरच्या प्रचारासाठी नाशिकची भाजप, शिवसेना दारोदारी 

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. ही पोटनिवडणुक सर्वच राजकीय पक्षांची परिक्षा घेणारी आहे. मात्र, राज्य सरकारमध्ये मांडीला मांडी लावुन काम करणारे सहकारी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यात आमने सामने आहेत. त्यांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने शेजारचा जिल्हा म्हणुन दोन्ही पक्षांतील नाशिकचे कार्यकर्ते गेले काही दिवस मतदारांच्या गाठीभेटींसाठी दारोदार संपर्क करीत होते.
पालघरच्या प्रचारासाठी नाशिकची भाजप, शिवसेना दारोदारी 

नाशिक : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. ही पोटनिवडणुक सर्वच राजकीय पक्षांची परिक्षा घेणारी आहे. मात्र, राज्य सरकारमध्ये मांडीला मांडी लावुन काम करणारे सहकारी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यात आमने सामने आहेत. त्यांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने शेजारचा जिल्हा म्हणुन दोन्ही पक्षांतील नाशिकचे कार्यकर्ते गेले काही दिवस मतदारांच्या गाठीभेटींसाठी दारोदार संपर्क करीत होते.

शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते विधान परिषदेच्या निवडणुकीतुन मोकळे झाल्यावर त्यांनी पालघर निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. उमेदवार श्रीनिवास वनगा यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत विविध भागात प्रचार केला. दत्ता गायकवाड, महापालिकेतील गटनेते सुधाकर बडगुजर, माजी नगरसेवक प्रकाश बोराडे, महापालिका कामगार सेनेचे अध्यक्ष बंटी तिदमे आदींसह विविध कार्यकर्ते प्रचारात होते. मतदानाच्या दिवशीही हे कार्यकर्ते पालघर मतदारसंघात राहतील. 

भारतीय जनता पक्षाच्या आमदार देवयानी फरांदे, महापालिका गटनेते दिनकर पाटील, अनिल भालेराव, प्रदेश सचिव लक्ष्मण सावजी, नगरसेवक अजिंक्‍य साने, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष समीर चव्हाण, अजित ताडगे यांसह मोठ्या संख्येने नाशिकचे विविध कार्यकर्ते प्रचारात गुंतले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com