Nashik Sangram Kote Progam | Sarkarnama

राष्ट्रवादीच्या आंदोलनांमुळे मंत्र्यांना जमिनीवर पायही ठेवता येणार नाही : संग्राम कोते-पाटील 

संपत देवगिरे 
शनिवार, 21 जुलै 2018

राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज उत्तर महाराष्ट्र बूथ कमिटी सक्षमीकरण संकल्प मेळावा आज येथे झाला. यावेळी माजी मंत्री शशीकांत शिंदे, निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश आदिक यांसह विविध वरिष्ठ नेते उपस्थित होते.

नाशिक : ''दिवसेंदिवस राज्यातील भाजप सरकारवरचा विश्‍वास उडत चालला आहे. युवक दिशाहीन झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसला प्रचंड मोठी आंदोलने करावी लागतील. या आंदोलनांच्या प्रभावाने सरकारच्या मंत्र्यांना जमिनीवर पायही टेवता येणार नाही अशी स्थिती निर्माण व्हावी. त्यासाठी युवकांना समाजाला पक्षाशी जोडले पाहिजे. बुथ रचना सक्षम केली पाहिजे,'' असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी केले. 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज उत्तर महाराष्ट्र बूथ कमिटी सक्षमीकरण संकल्प मेळावा आज येथे झाला. यावेळी माजी मंत्री शशीकांत शिंदे, निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश आदिक यांसह विविध वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी शिंदे म्हणाले, ''इतिहासात आजवर कधीही सत्तेसाठी सत्तेचा एव्हढा गैरवापर झाल्याचे आजवर घडले नाही. सध्याचे सरकार सत्ता टिकविण्यासाठी सत्तेचा गैरवापर करते. त्यासाठी कारस्थान करुन निर्दोष व्यक्तींना अटक करते. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनाही त्यांनी सूट बुध्दीने कारागृहात डांबले. त्यामुळे बहुजनांवर अन्याय झाला. नाशिकचा विकास थांबला. आता हे सरकार शिवाजी महाराजांचा पुतळा छोटा करीत आहे. गुजरातच्या सरदार पटेलांपेक्षा कमी उंचीचा पुतळा झाल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस शांत बसणार नाही," 

माजी मंत्री तुकाराम दिघोळे, आमदार सर्वश्री नरहरी झिरवाळ, दीपिका चव्हाण, माजी आमदार जयंत जाधव, दिलीप बनकर, दिलीप वाघ, संदीप गुळवे, रत्नाकर चुंभळे, श्रीराम शेटे, नानासाहेब महाले, भारती पवार आदी यावेळी उपस्थित होते. शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी प्रास्ताविक केले. 
 

संबंधित लेख