Nashik Samruddhi Mahamarg | Sarkarnama

पुढील आठवड्यात 'समृध्दी'ची मोजणी? 9 तहसिलदार भुमी व्यवस्थापक नियुक्त

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 जुलै 2017

या प्रकल्पाला सिन्नर तालुक्यात तीव्र विरोध आहे. त्यामुळे राज्यातील अन्य जिल्ह्यांतील मोजणी झाली असली तरी येथील जमिन मोजणी मात्र शेतकरी आंदोलन व विरोधामुळे रखडली आहे. त्यासाठी केलेल्या नव्या नियुक्त्यांमध्ये जिल्ह्यातील 2 तर विभागातील 3 तहसिलदारांचा समावेश आहे.

नाशिक - मुंबई- नागपूर समृध्दी महामार्गाच्या रखडलेले मोजणीचे काम पुढील आठवड्यात पुन्हा सुरु केले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्यातील नऊ तहसीलदारांची राज्य रस्ते विकास महामंडळत भूमी व्यवस्थापक पदावर प्रतिनियुक्तीवर बदली केली आहे.

या प्रकल्पाला सिन्नर तालुक्यात तीव्र विरोध आहे. त्यामुळे राज्यातील अन्य जिल्ह्यांतील मोजणी झाली असली तरी येथील जमिन मोजणी मात्र शेतकरी आंदोलन व विरोधामुळे रखडली आहे. त्यासाठी केलेल्या नव्या नियुक्त्यांमध्ये जिल्ह्यातील 2 तर विभागातील 3 तहसिलदारांचा समावेश आहे. शेतकरी संपासून थंडावलेल्या नागपूर मुंबई समृध्दी महामार्गाच्या रखडलेल्या कामाला पुढील आठवड्यापासून पून्हा गती येण्याची चिन्हे आहेत. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात जमिनींचे दर निश्‍चितीचे काम पूर्णत्वास आले आहे. नाशिकला हे काम अंतिम टप्प्यात आहे. समृध्दी महामार्गाच्या रखडलेल्या कामाला गती देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पून्हा एकदा कामाला गती आली आहे. शासनाने जमीन मोजणीच्या कामासाठी जादा अधिकारी वर्ग करण्यास सुरुवात केली आहे.

यात नाशिक जिल्ह्यातील बबन काकडे व मीनाक्षी राठोड (चव्हाण) व नगर जिल्ह्यातील कैलास कडलग अशा तीन तहसिलदारांना भूमी व्यवस्थापक म्हणून नव्या कामावर रूजू करण्याचे आदेश आहेत. संपादित जमीनीच्या व्यवस्थापनासह खरेदीसह तत्सम प्रक्रियेच्या प्रशासकीय कामासाठी व्यवस्था उभारण्याचे काम सुरु झाले आहे.

 

संबंधित लेख