nashik samp | Sarkarnama

मराठा आरक्षणासाठी साकोरा येथे बैलगाड्यांचा रास्ता रोको, जिल्हा विस्कळीत

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि आंदोलकांवरील चुकीचे गुन्हे मागे घेण्यात यावेत या मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदमुळे जिल्हा अक्षरशः ठप्प झाला. महाराष्ट्र बंदमधुन नाशिक वगळले होते तरी व्यवस्था ठप्पच होती. मुंबई आग्रा महामार्गावर नऊ ठिकाणी रास्ता रोको झाल्याने वाहतुक पूर्णतः विस्कळीत तर व्यापारी पेठांत व रस्यावर शुकशुकाट होता. साकोरा (नांदगाव) येथे शेतकऱ्यांनी बैलगाड्या महामार्गावर आणल्याने दोन तास वाहतुक ठप्प झाल्याने हे आगळे वेगळे आंदोलन चर्चेचा विषय ठरला. 

यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे जिल्ह्यात आंदोलन होणार असल्याने पोलिस आणि नागरीक दोघेही दक्ष होते. उस्फुर्त आंदोलन त्यात नागरिकांच्या सहभागामुळे जिल्ह्यात शंभराहून अधिक गावांत आंदोलन झाले. विशेषतः मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोकोचे पडसाद उमटले. साकोरा (ता. नांदगाव) येथे शेतकऱ्यांनी बैलगाड्या रस्त्यावर आणल्याने चाळीसगाव राज्य मार्गावरील वाहतुक ठप्प झाली. पुढे हे आंदोलक सरळ नांदगावला रेल्वे नाका येथे आले त्यामुळे नांदगाव परिसरात त्याचा परिणाम झाला. जिल्ह्यात ठेंगोडा, इगतपुरी, कळवाडी फाटा, वडनेर, पाटोरे वणी, चांदवड, डोणगाव, चांदवड येथे रास्ता रोको झाल्याने मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतुक सकाळी ठप्प झाली. तर साळी येथे विंचुर प्रकाशा महामार्ग येथे रास्ता रोको झाला. निफाड, नैताळे येथे झालेल्या रास्ता रोकोमुळे औरंगाबाद महामार्गावर वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. एकंदर जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलनाने नाशिक ठप्प झाला. 

संबंधित लेख