nashik rpi vad | Sarkarnama

आठवलेंच्या पक्षात नाशिकमध्ये गॅंगवॉर होणे शक्‍य

सरकारनामा ब्युरो
रविवार, 11 जून 2017

नाशिक : रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये आगामी काळात गॅंगवॉर होण्याची चिन्हे आहेत. विविध गुन्हे दाखल असलेले जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांचे विरोधक एकत्र आले आहेत.

लोंढेपेक्षा अधिक गुन्हे नावावर असलेल्या माजी नगरसेवक पवन पवार यांना जिल्हाध्यक्ष करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी या सगळ्यांचे शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर सह्या घेण्यात आल्याचा प्रकार घडलाय. त्यामुळे या पक्षात आगामी काळात राजकीय वादाऐवजी "गॅंगवॉर' होते की सी स्थिती आहे. 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पवन पवार यांना प्रवेश दिल्याने भाजप प्रचंड अडचणीत आला होता. पवार यांच्यावर थोडे थोडके नव्हे तर खुनापासून, खंडणी, पोलिसांची हत्या, चोरी, दंगल असे तेवीस गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे भाजपला त्यावर सतत खुलासे करीत फिरावे लागत होते.

त्यामुळेच महापालिका निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नव्हती. त्यांनी अपक्ष उमेदवारी केल्याने भाजपच्या गळ्यातले लोढणे आपोआपच दूर झाले होते. त्यांच्यासाठी आता आठवलेंचा सबंध रिपब्लिकन पक्ष एकत्र आलाय. त्यांनी बैठक घेऊन लोंढे यांना अन्य पदावर नियुक्त करावे व पक्षाच्या विस्तारासाठी पवार यांना जिल्हाध्यक्ष करावे. केवळ ठराव नव्हे तर विश्‍वनाथ काळे सूचक व सुनील कांबळे हे अनुमोदक असलेला हा ठराव शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर लिहून त्यावर सगळ्यांच्या सह्या घेण्यात आला. या सह्या घेण्यासाठी पवन पवार याने प्रत्येकाला बोलावून सह्या संकलित केल्याचे बोलले जाते. 

पक्षाचे शहराध्यक्ष पवन क्षीरसागर यांच्याविषयीही पोलिसांत विविध तक्रारी आहेत. शहर संघटक अर्जुन पगारे हे सध्या जामिनावर आहेत.

या स्थितीत जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक प्रकाश लोंढे व त्यांची दोन्ही मुले पोलिसांच्या दृष्टीने हिस्ट्रीशीटर असून एक मुलगा सध्या दुहेरी हत्या प्रकरणात तुरुंगात आहे. पोलिसाला धमकावल्याप्रकरणी प्रकाश लोंढे सध्या जामिनावर आहेत.

शहरात "पीएल' ग्रुप सोनसाखळी चोऱ्या, वाहनांची जाळपोळ तसेच दहशत पसरवण्याचे काम करतो असा पोलिसांचा अहवाल आहे. पवन पवार यांची जेल रोड भागात स्वतंत्र टोळी सक्रिय आहे. दोन्ही नेते (?) आणि त्यांचे समर्थक (?) राजकीय वादविवादात अडकतात की त्यांच्यात "गॅंगवॉर' होते हा उत्सुकतेचा विषय आहे. 

पवन पवार सदस्यच नाही 
दरम्यान याबाबत जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी पवन पवार हा पक्षाचा सदस्यच नाही. त्यामुळे त्याला पद देताच येणार नाही. त्याने आधी माझ्याकडे येऊन सदस्य व्हावे नंतर विचार करु. तळेगाव दंगलीत आरोपी असल्याने रामदास आठवले त्याला भेटायला गेले असता खुप टीका झाली होती. त्यामुळे अशा लोकांचे काय करायचे हे पक्षानेच ठरवावे. 
 
संबंधित लेख