nashik-prithviraj-chavan-criticises-modi | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

अदानींसाठी मोदींनी शंभर विमानांचे टेंडर काढले : पृथ्वीराज चव्हाण

संपत देवगिरे
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

नाशिक : अंबानींच्या पावलावर पाऊल ठेऊन अदानी डिफेन्स सिस्टीमस् अॅण्ड टेक्नॉलॉजीज कंपनीची नोंदणी झाली आहे. शंभर लढाऊ विमानांची निविदा सरकारने काढली आहे. त्यामुळे लवकरच मोदींचा दुसरा मोठा घोटाळा उघडकीस येणार आहे, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

फ्रेंडस् ऑफ डेमोक्रसी संस्थेच्या `राफेल विमान खरेदी मोदी दोषी आहेत का?" या विषयावर त्यांचे सादरीकरणासह व्याख्यान झाले. यावेळी झालेल्या प्रश्र्नोत्तरांना उत्तर देताना त्यांनी वरिल माहिती दिली.

ते म्हणाले, की हवाई दलाला 126 राफेल विमाने हवी होती. तसा करार युपीए सरकारने केला होता. त्यासाठी संरक्षण खरेदीची सर्व प्रक्रीया पुर्ण करण्यात आली. मात्र मोदीनी परस्पर हा करार रद्द ठरवला. 36 विमाने तिप्पट दराने खरेदी केली. मग उर्वरित 90 विमानांचे काय? हा प्रश्न शिल्लक राहतो. यासंदर्भात आणखी गंभीर माहिती पुढे येणार आहे. नुकतीच अदानी यांनी अदानी डिफेन्स सिस्टीमस् अॅण्ड टेक्नॉलॉजीज कंपनीची नोंदणी केली आहे. त्यासाठी स्वीडनच्या कंपनीशी ते बोलणी करीत आहेत. 

ग्रीपीन विमाने तयार करण्याची प्रक्रिया करत आहे. या सर्व प्रकरणात देशाचे संरक्षण यंत्रणा खाजगी उद्योगपतींच्या हाती जातील. त्यांना त्याबाबतचा काहीही अनुभव नाही. देशाची नवरत्न संस्था एचएएल मोडीत निघेल. हजारो बेरोजगार होतील. त्यामुळे या विषयावर तज्ञ, जाणकार आणि निवृत्त अधिकारी यांनी पुढे येऊन बोलले पाहिजे. हा राजकीय नव्हे तर देशाची संरक्षण सिध्दता व एचएएल च्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी आम आदमी पक्षाच्या प्रीती शर्मा-मेनन, भाकपचे सेक्रेटरी सदस्य भालचंद कांगो, माजी आमदार जयंत जाधव यांनी राफेल प्रकरणी भूमिका मांडली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विनायक दादा पाटील, अॅड भगीरथ शिंदे, डाॅ शोभा बच्छाव आदी उपस्थित होते.

संबंधित लेख